Parliament Winter Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशीही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यातील कोंडी संपलेली नाही. परिणामी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले. लोकसभेचे कामकाज दुपारनंतरही सुरू होऊ शकले असले तरी या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज ठप्प झाले. Parliament Winter Session Opposition riots continue to disrupt Parliament for third day in A Row
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशीही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी यांच्यातील कोंडी संपलेली नाही. परिणामी संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले. लोकसभेचे कामकाज दुपारनंतरही सुरू होऊ शकले असले तरी या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज ठप्प झाले.
हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून विरोधी पक्षाचे खासदार संसद भवन संकुलात जमले आणि केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात निदर्शने केली, राज्यसभेतील विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. केंद्र सरकारला लोकशाहीत विरोधकांचा आवाज दाबायचा आहे आणि त्यासाठीच नियम डावलून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्यात आल्याचे विरोधी पक्षाच्या खासदारांनी म्हटले.
या निदर्शनानंतर विरोधी पक्षाचे सर्व खासदार सभागृहात परतले असले तरी निलंबित करण्यात आलेले खासदार संसद भवन संकुलातील गांधी पुतळ्याजवळ धरणे देत होते. आम्ही काहीही चुकीचे केले नसून माफीचा प्रश्नच नाही, असे खासदारांचे म्हणणे आहे. जोपर्यंत त्यांचे निलंबन मागे घेतले जात नाही, तोपर्यंत असेच आंदोलन करत राहणार, असेही ते म्हणाले.
निलंबित खासदार गांधी पुतळ्याजवळ धरणे दिले, मात्र संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या आत गेलेल्या विरोधी खासदारांनी पुन्हा एकदा निलंबित खासदारांच्या बाजूने आवाज उठवला. त्यामुळे राज्यसभेच्या सभापतींनीही त्यांच्या वृत्तीवर नाराजी व्यक्त केली, तर लोकसभेच्या अध्यक्षांनी संसदेच्या आत आंदोलन करणाऱ्या विरोधी खासदारांना खडसावले.
हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवसही विरोधकांच्या गदारोळात वाया गेला. आज संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालले असते, तर महागाईसारख्या अनेक मुद्द्यांवर चर्चेची मागणी करणाऱ्या नोटिसीवर चर्चा होऊ शकली असती, पण तसे होऊ शकले नाही.
Parliament Winter Session Opposition riots continue to disrupt Parliament for third day in A Row
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App