अमित शाह यांच्या उपस्थितीत मोडला जाणार पाकिस्तानचा विक्रम , एकाचवेळी ७५ हजार राष्ट्रीय ध्वज फडकवणार


विशेष प्रतिनिधी

पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत होणाऱ्या समारंभात जागतिक विक्रम होणार आहे. एकाच वेळी ७५ हजार राष्ट्रीय ध्वज फडकाविण्यात येणार आहेत. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत शनिवारी भोजपूर जिल्ह्यातील जगदीशपूरमध्ये बाबू वीर कुंवर सिंह यांनी इंग्रजांवर विजय प्राप्त केल्याच्या स्मृतीमध्ये विजयोत्सव समारंभात शाह प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत.Pakistan’s record will be broken in the presence of Amit Shah, hoisting 75,000 national flags simultaneously

या समारंभात तिरंगा फडकावून विक्रम होईल. यापूर्वीचा विक्रम हा पाकिस्तानचा त्यामुळे पाकिस्तानचा विक्रम मोडला जाईल.सर्वाधिक राष्ट्रीय ध्वज फडकाविण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. २००४ मध्ये ५७,६३२ राष्ट्रीय ध्वज एकाचवेळी फडकाविण्यात आले होते. आता गिनीज बुकचे एक पथकही येथे दाखल झाले आहे. एक लाखापेक्षा जास्त तिरंगा फडकाविण्याचा या कार्यक्रमात प्रयत्न आहे.वीर कुंवर सिंह यांना ना इतिहासकारांनी न्याय दिला, ना सरकारने, अशी आजवरची एक भावना येथे आहे. त्यांना न्याय देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८५७ च्या क्रांती संग्रामात भोजपूर भागात बाबू वीर कुंवर सिंह यांनी इंग्रजांशी लढाई केली.

त्यांनी इंग्रजांना हुसकावून लावून विजय प्राप्त केला होता. या लढाईत ते जखमी झाले होते. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी दरवर्षी जगदीशपूरमध्ये विजयोत्सवाचे आयोजन केले जाते. १६५ वर्षांनंतरही भोजपूरमध्ये त्यांची वीर गाथा लोकगीतांच्या माध्यमांतून घराघरात जागी आहे.

Pakistan’s record will be broken in the presence of Amit Shah, hoisting 75,000 national flags simultaneously

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था