विशेष प्रतिनिधी
अमृतसर : उडता पंजाब म्हणजे पंजाब राज्य अंमली पदार्थांच्या तस्करीचे केंद्र बनले आहे. मात्रल पाकिस्तानी ड्रोनव्दारे भारतीय हद्दीत पंजाबच्या सीमेवर अमली पदार्थ व शस्त्रांची तस्करी करण्याचा झालेला प्रयत्न सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) बुधवारी पहाटे हाणून पाडला.Pakistani drones fly to Punjab, BSF thwarts drug smuggling attempt
पाकिस्तानातून भारतीय हद्दीत ड्रोन आल्याचा संशय येताच त्याच्या दिशेने जवानांनी गोळीबार केला. ही घटना पंजाब सीमेवरील गुरुदासपूर भागातल्या पंजग्रेन परिसरात घडली. तेथील घग्गर व सिंघोके गावांमध्ये बीएसएफ जवानांनी शोध घेतला असता त्यांना दोन पिवळ्या रंगाची पाकिटे सापडली. भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या कुंपणापासून २.७ किमी दूर अंतरावर भारतीय हद्दीत ही पाकिटे टाकण्यात आली होती.एका पाकिटात पिस्तूल तर दुसऱ्या पाकिटात अमली पदार्थ आढळून आले.
याआधी डिसेंबर महिन्यात पाकिस्तानातून भारतीय हद्दीत पंजाबमधील फिरोजपूर भागात आलेले एक ड्रोन बीएसएफ जवानांनी गोळीबार करून पाडले होते. ते चिनी बनावटीचे ड्रोन होते. अगदी कमी उंचीवरून उड्डाण करत असलेल्या या ड्रोनमध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नव्हती.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानातून एक ड्रोन घुसखोरी करून पंजाबच्या गुरुदासपूर भागात आले होते. पण बीएसएफ जवानांनी गोळीबार केल्यानंतर ते माघारी गेले. या ड्रोनमधून भारतीय हद्दीत काही वस्तू टाकण्यात आल्या का, याचा त्यावेळी शोध घेण्यात आला. पण त्यावेळी बीएसएफच्या हाती काहीही लागले नव्हते.
डिसेंबर २०२०मध्ये एका पाकिस्तानी ड्रोनने पंजाबच्या गुरुदासपूर जिल्ह्यातील सीमाभागात एक पिशवी टाकली होती. त्यात ११ हातबॉम्ब बीएसएफ जवानांना सापडले होते. सीमेपलीकडून ड्रोनद्वारे भारतीय हद्दीत अमली पदार्थ, शस्त्रे यांची तस्करी करण्याचा प्रयत्न होतो. गेल्या काही महिन्यात पंजाबलगतच्या आंतरराष्ट्रीय सीमाभागात अशा काही घटना घडल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App