विशेष प्रतिनिधी
लाहोर : पाकिस्तानात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने आता तेथील अनेक शहरांत लॉकडाउन लागू होणार आहे. सर्वात आधी लाहोरमध्ये संपूर्ण लॉकडाउन करण्यात येणार आहे.Pakistan heading towards lockdown
शहरातील सर्व व्यवहार आणि बाजारपेठ बंद राहणार आहेत. जीव वाचवण्यासाठी कडक निर्बंध लागू केले जात असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.पाकिस्तानात बाधित होण्याचे प्रमाण १०.४१ टक्क्यांवर पोचले आहे.
गेल्या चोवीस तासात ५११२ जणांना कोरोनाची लागण झाली असून १३१ जणांचा मृत्यू झाला आहे. लाहोर येथे १०८६ जणांना नव्याने बाधा झाली असून ३० जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत ८ लाख २० हजार ८२३ जणांना कोरोना झाला असून १७,८११ जणांचा मृत्यू झाला आहे.
लॉकडाउनमध्ये केवळ पेट्रोल पंप, मेडिकल स्टोअर्स आणि लसीकरण केंद्र सुरू राहतील. पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार यांनी आज बोलावलेल्या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांवर चिंता व्यक्त केली आणि अधिक बाधित लाहोर आणि अन्य शहरात ईदच्या अगोदर संपूर्ण लॉकडाउन लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव मांडला आहे.
या बैठकीत पंजाब प्रांतातील २३ जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण ८ टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि लाहोर, रावळपिंडी, फैसलाबाद आणि अन्य शहरात रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App