विशेष प्रतिनिधी
जम्मू– ड्रोनच्या साहाय्याने जम्मूतील हवाई तळावर टाकण्यात आलेल्या बॉम्बमधील प्रेशर फ्युजवरून दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्करातील काही घटक किंवा आयएसआयची तांत्रिक साथ मिळाल्याचे स्पष्ट होते. पाक लष्कराकडून अशाच प्रेशर फ्यूजचा वापर केला जातो, असे सुरक्षा सुरक्षा सूत्रांनी सांगितले. Pak help for drone attack in JK
आईडी किंवा स्फोट घडवून आणणाऱ्या मुख्य भागाचे कवच आणि स्फोटके यांच्यातील जागेत प्रेशर फ्यूजचा वापर केला जातो. सुरुंग, रणगाडे निकामी करण्यासाठी प्रेशर फ्युजचा वापर केला जातो. या फ्युजवर वाहन अथवा व्यक्तीचा पाय पडल्यास स्फोट होतो. अत्याधुनिक आयईडीमध्ये मात्र बॉम्बच्या पुढील भागावर प्रेशर फ्यूज लावण्यात आला होता. जमिनीवर पडताच जोरात स्फोट व्हावा हा यामागील उद्देश होता.
लष्करै तैयबाकडून २७ जून रोजी जम्मू विमानतळावरील हवाई दलाच्या इमारतीवर आयईडी (सुधारित स्फोटक साधन) टाकण्यात आले. त्यात एक किलोपेक्षा कमी आरडीएक्स आणि इतर रसायनांचे मिश्रण होते. जमिनीवर टाकण्यात आलेल्या साधनात एक किलोहून जास्त घातक स्फोटके होती. त्यात बॉल बेअरींग्जचाही समावेश होता.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App