सीडीएस जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांना त्यांचा पुरस्कार प्रदान केला. गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत यांचे निधन झाले होते. त्यांच्या शौर्याला सलाम करत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सीडीएस जनरल बिपिन रावत यांना पद्मविभूषण (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनरल बिपिन रावत यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांना त्यांचा पुरस्कार प्रदान केला.Padma Awards 2022: Distribution of Padma Awards by the President, 10 Padma Awards to Maharashtra, General Bipin Rawat posthumously honored with Padma Vibhushan
Daughters of CDS General Bipin Rawat, Kritika and Tarini receive his Padma Vibhushan award (posthumous) pic.twitter.com/rJv1xnPmys — ANI (@ANI) March 21, 2022
Daughters of CDS General Bipin Rawat, Kritika and Tarini receive his Padma Vibhushan award (posthumous) pic.twitter.com/rJv1xnPmys
— ANI (@ANI) March 21, 2022
गेल्या वर्षी हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत यांचे निधन झाले होते. त्यांच्या शौर्याला सलाम करत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे. याशिवाय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले.
Senior Congress leader Ghulam Nabi Azad receives his Padma Bhushan award, in the field of Public Affairs pic.twitter.com/Y5BGatts4q — ANI (@ANI) March 21, 2022
Senior Congress leader Ghulam Nabi Azad receives his Padma Bhushan award, in the field of Public Affairs pic.twitter.com/Y5BGatts4q
प्रजासत्ताक दिनाच्या आधी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. पद्म पुरस्कार विजेत्यांमध्ये एकूण 128 जणांचा समावेश आहे. यापैकी चार जणांना पद्मविभूषण, 17 जणांना पद्मभूषण आणि 107 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्राला 10 पद्म पुरस्कार
पद्म विभूषण 1) प्रभा अत्रे (कला)
पद्मभूषण 2) नटराजन चंद्रशेखरन (व्यापार आणि उद्योग) 3) सायरस पूनावाला (व्यापार आणि उद्योग)
पद्मश्री 4) डॉ. हिंमतराव बावस्कर (वैद्यकशास्त्र) 5) सुलोचना चव्हाण (कला) 6) डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे (वैद्यकशास्त्र) 7) सोनू निगम (कला) 8) अनिल कुमार राजवंशी (विज्ञान आणि अभियांत्रिकी) 9) डॉ. भीमसेन सिंघल (वैद्यकशास्त्र) 10) डॉ. बालाजी तांबे (मरणोत्तर) – (वैद्यकशास्त्र)
या वर्षी 128 पद्म पुरस्कार
राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी एकूण 128 पद्म पुरस्कार प्रदान केले जात आहेत, यात दोन पुरस्कार विभागून दिले जाणार आहेत (दोन व्यक्तींना पुरस्कार असला तरी तो एक पुरस्कार गणला जातो). यंदाच्या पुरस्कार विजेत्यांच्या यादीत 4 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 107 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश असून यापैकी 34 महिला आहेत. या यादीमध्ये परदेशी, एनआरआय, पीआयओ, ओसीआय या श्रेणीतील 10 व्यक्ती आहेत आणि 13 जणांना मरणोत्तर पुरस्कार आहे.
तीन श्रेणींमध्ये दिला जातो पद्म पुरस्कार
पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान केले जातात. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, औषध, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा /कार्यक्षेत्रांत हे पुरस्कार दिले जातात. ‘पद्मविभूषण’ हा पुरस्कार उल्लेखनीय आणि अतुलनीय सेवेसाठी दिला जातो. उच्च श्रेणीतील अतुलनीय सेवेसाठी ‘पद्मभूषण’ आणि कोणत्याही क्षेत्रातील अतुलनीय सेवेसाठी ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरवण्यात येते. दरवर्षी प्रजासत्ताक दिनी या पुरस्कारांची घोषणा केली जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App