PADMA AWARDS 2021 : पद्म पुरस्कार सोहळ्यात बोलबाला!ज्यांना पाहून मोदी-शाहांनी नमस्कार केला – कोण आहेत तुलसी गौडा?


पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षणाच्या कामासाठी तुलसी गौडा यांचा गौरव करण्यात येत असल्याचं राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं गेलंय. PADMA AWARDS 2021: Bolbala at Padma Awards Ceremony! Whom Modi-Shah saluted – Who is Tulsi Gowda?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात काल (सोमवारी ) अलौकिक कार्य करणाऱ्यांना राष्ट्रपती भवनात 2020 च्या पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये सात जणांना पद्म विभूषण, 10 जणांना पद्म भूषण आणि 102 जणांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.या दरम्यान कर्नाटकातील पर्यावरणतज्ज्ञ तुलसी गौडा यांनी पुरस्कार सोहळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

पर्यावरणाचं संवर्धन आणि संरक्षणाच्या कामासाठी तुलसी गौडा यांचा गौरव करण्यात येत असल्याचं राष्ट्रपती कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटलं गेलंय.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांनी तुलसी गौडा यांचा फोटो शेअर केला आहे. तुलसी गौडा जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी पोहोचल्या तेव्हा त्यांच्या अंगावर पारंपारिक धोतर होत आणि त्या अनवाणी होत्या.

तुलसी गौडा यांचं पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून स्वागत

पद्म पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यामध्ये ज्यावेळी तुलसी गौडा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आल्या त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांचं हात जोडून स्वागत केलं.

नरेंद्र मोदी यांनी हा फोटो इन्स्टाग्रामसह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. अनेक नेटकऱ्यांनी त्या फोटोला “इमेज ऑफ द डे” हे कॅप्शन दिलं आहे.

तुलसी गौडा कोण आहेत?

कर्नाटकातील हलक्की जमातीतील तुलसी गौडा यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांनी औपचारिक शिक्षणही घेतले नाही.निसर्गावरील प्रेमामुळे त्या त्यांचा जास्तीत जास्त वेळ जंगलात घालवत. हळूहळू या जंगलानेही त्यांना ओळखले आणि वनस्पती आणि वनौषधींच्या ज्ञानामुळे आज जग त्यांना ‘इनसायक्लोपिडीया ऑफ फॉरेस्ट’ म्हणून ओळखत आहे.

७७ वर्षांच्या असूनही तुलसी गौडा पर्यावरण रक्षणाचे महत्त्व जोपासत आहेत. रोपे लावा आणि त्याचे ज्ञान तरुण पिढीला सामायिक करा. तुलसी गौडा देखील वनविभागात तात्पुरती स्वयंसेवक म्हणून रुजू झाल्या, नंतर त्यांना वन विभागात कायमस्वरूपी नोकरीची ऑफर देण्यात आली.

PADMA AWARDS 2021: Bolbala at Padma Awards Ceremony! Whom Modi-Shah saluted – Who is Tulsi Gowda?

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात