कोरोनाच्या उद्रेकात ऑक्सिजन मिळत नसल्याने लोक हवालदिल झाले आहे. त्यामुळे नावात ऑक्सिजन असलेली कंपनी ऑक्सिजनची उत्पादन करणारी असल्याचे वाटल्याने गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या पडल्या. त्यामुळे बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या तीन महिन्यात तब्बल १५७ टक्के वाढ झाली आहे. मात्र, या कंपनीचा ऑक्सिजनच्या उत्पादनाशी काहीही संबंध नसल्याचेही दिसून आले आहे.Oxygen is the lifeblood of the company’s stock, 157 per cent rise in three months
विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोरोनाच्या उद्रेकात ऑक्सिजन मिळत नसल्याने लोक हवालदिल झाले आहे. त्यामुळे नावात ऑक्सिजन असलेली कंपनी ऑक्सिजनची उत्पादन करणारी असल्याचे वाटल्याने गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या पडल्या.
त्यामुळे बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या तीन महिन्यात तब्बल १५७ टक्के वाढ झाली आहे. मात्र, या कंपनीचा ऑक्सिजनच्या उत्पादनाशी काहीही संबंध नसल्याचेही दिसून आले आहे.
१ फेब्रुवारी २०२१ रोजी बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंट चा शेअर ९ हजार ९६५ रुपये होता. यानंतर या शेअरमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कंपनीचा शेअर तब्बल २४ हजार ५७४ रुपयांवर गेला आहे.
शेअर बाजारातील रेमडेसिवीर आणि ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना सुगीचे दिवस आले आहेत. म्हणूनच गुंतवणूकदारांचा ओढा या कंपन्यांकडे वाढला आहे. केवळ नावावरून गुंतवणूकदारांनी अशा नावाच्या शेअर्समध्ये सरसकट गुंतवणूक करत आहेत.
त्यामुळे या कंपनीच्या शेअरमध्ये तीन महिन्यांत तब्बल १५७ टक्के वाढ झाली आहे.बॉम्बे ऑक्सिजन इन्व्हेस्टमेंटऔद्योगिक वापराकरीता गॅस पुरवठा करत होती. मात्र २०१९ पासून हा व्यवसाय बंद केला असून बिगर बँकिंग वित्त पुरवठा क्षेत्रात कंपनीने विस्तार केला आहे. ए
प्रिल महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये १२० टक्के वाढ झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला कंपनीचा शेअर ११ हजार २५५ रुपये होता. आता या शेअरची किंमत २४ हजार ५७४ रुपये झाली आहे. कंपनीने २०१८ मध्ये नावात बदल केला. कंपनीची रिझर्व्ह बँकेकडे बिगर बँकिंग वित्त संस्था म्हणून नोंदणी आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये विविध राज्यांमधील कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे काही राज्यांना ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. मात्र, कंपनीच्या व्यवसायाची खातरजमा न करता गुंतवणूकदारांनी बॉम्बे ऑक्सिजनन इन्व्हेस्टमेंटच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App