लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा देशात तुटवडा भासणार नाही;जुलै अखेरपर्यंत १३००० मेट्रीक टन ऑक्सिजनची आयात; ७ देशांशी व्यापार केंद्राचे करार


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा दुसऱ्या लाटेनेच देशात थैमान घातले असताना शास्त्रज्ञ सप्टेंबर – ऑक्टोबरमधल्ये येणाऱ्या तिसऱ्या लाटेचाही इशारा देताहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने विविध सामग्री आयातीसाठी विविध देशांशी करार केले आहेत.Our requirement of liquid medical oxygen (LMO) has gone up to 10,000 MT now. We’ll get 13,000 MT imported LMO by July, says Union Minister Dharmendra Pradhan

लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा देशात तुटवडा भासू नये यासाठी ७ देशांशी व्यापार करार करण्यात आले असून जुलैअखेरपर्यंत देशात १३००० मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध होईल, अशी माहिती केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.



रताची लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची गरज आता १०००० मेट्रीक टनपर्यंत पोहोचली आहे. त्यासाठी सिंगापूर, बहारिन, दुबई, कतार, सौदी अरेबिया, ओमान आणि कुवैत या देशांशी करार केले आहेत.

हे देश संबंधित करारानुसार भारताला ऑक्सिजन पुरवठा करतील. जुलै अखेरपर्यंत देशात १३००० मेट्रीक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा साठा असेल, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.

आंतरराष्ट्रीय मदतीचा ओघ वाढला

देशाला आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही वैद्यकीय उपकरणांच्या मदतीचा ओघ वाढला असून २७ एप्रिल ते १५ मे २०२१ पर्यंत भारताला विविध देशांनी ११०५८ ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स, १३४९६ ऑक्सिजन सिलिंडर्स, १९ ऑक्सिजन जनरेशन प्लँट्स,

७३६५ व्हेंटिलेटर्स, ५.३० लाख रेमडिसीवीर इंजेक्शन्स यांचा पुरवठा केला आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या हवाल्याने एनएनआयने ट्विटरद्वारे दिली आहे.

Our requirement of liquid medical oxygen (LMO) has gone up to 10,000 MT now. We’ll get 13,000 MT imported LMO by July, says Union Minister Dharmendra Pradhan

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात