विरोधकांच्या अपप्रचारामुळे जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरीला विलंब, कोव्हॅक्सिनच्या निर्मात्यांनी व्यक्त केली खंत

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : विरोधकांच्या अपप्रचारामुळेच स्वदेशी कोरोना लस कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाला आहे अशी खंत भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा एला यांनी व्यक्क केली आहे. विरोधकांच्या राजकारणावर कोव्हॅक्सिनच्या निर्मात्यांनी खंत व्यक्त केली.Opponents’ propaganda delays World Health Organization approval, covaxin makers lament

कृष्णा एला म्हणाले, या लसीवर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. तसेच याला भाजपाची लसही म्हटले गेले, असे कृष्णा एला यांनी म्हटले. भारतात कोव्हॅक्सिनच्या मात्रा देण्यास याआधीच सुरुवात करण्यात आली आहे. केंद्र सरकारने याआधीच या लसीला मान्यता दिली होती



. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कोव्हॅक्सिनचा वापर होण्यासाठी या लसीला डब्ल्यूएचओची मान्यता आवश्यक होती. गेल्या अनेक दिवसांपासून या मान्यतेची प्रतीक्षा होती. अखेर डब्ल्यूएचओने कोव्हॅक्सिनला परवानगी दिली.

याबाबत बोलताना कृष्णा एला यांनी विरोधकांनी निर्माण केलेल्या प्रश्नांमुळे जगभरात या लसीबाबत गैरसमज निर्माण झाले आणि शेवटी डब्ल्यूएचओकडून या लसीला मंजुरी मिळण्यास विलंब झाला, असे म्हटले. लसीबाबत देशात नकारात्मक प्रचार सुरू होता आणि त्याचा परवानगी मिळण्यावर परिणाम दिसून आला,

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोव्हॅक्सिनचा डोस घेतल्यानंतरही हा प्रचार थांबला नाही असे सांगून कृष्णा एला म्हणाले, यानंतर काही लोक या लसीचा प्रचार भाजपाची लस म्हणून करू लागले. त्याऐवजी आत्मनिर्भर भारताच्या मंत्राखाली भारतीय विज्ञानाचे कौतुक करायला हवे होते.

सुरुवातीच्या टप्प्यात लसीबाबत विविध प्रकारचा अपप्रचार सुरू असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे लस घेणाऱ्या लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर लोकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लस घेतली होती.

कृष्णा म्हणाले, दोन्ही लसींचा बूस्टर डोस सहा महिन्यांनी दिल्यास ते योग्य ठरेल. या संदर्भात सरकारचे म्हणणे आहे की, प्रथम प्रत्येकाला लसीचा दुसरा डोस देणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यानंतरच त्यावर काम केले जाईल. अनेक पाश्चात्य देशांनीही बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली आहे. कोव्हॅक्सिनचा बूस्टर डोस नाकाद्वारे देण्यात येणार आहे.

Opponents’ propaganda delays World Health Organization approval, covaxin makers lament

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात