कोरोना विरुध्दच्या लढाईत आता नौदलही, ऑक्सिजन आणि वैद्यकीय साहित्य पुरविण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू


कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने देशात आॅक्सिजन आणि वैद्यकीय साहित्याचा मोठा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आता भारतीय नौदलाने मोर्चा सांभाळला असून ऑक्सिजन आणि इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू सुरू केले आहे.Operation Samudra Setu to supply naval, oxygen and medical supplies in the fight against the Corona


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने देशात ऑक्सिजन आणि वैद्यकीय साहित्याचा मोठा तुटवडा भासत आहे.

त्यामुळे आता भारतीय नौदलाने मोर्चा सांभाळला असून ऑक्सिजन आणि इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करण्यासाठी ऑपरेशन समुद्र सेतू सुरू केले आहे.ऑपरेशन समुद्र सेतूच्या माध्यमातून नौदल कोलकाता, तलवार, त्रिकंद, जलश्व, कोच्ची आणि ऐरावत ही सात जहाजे मेडीकल ऑक्सिजन तसेच क्रायोजेनिक कंटेनर्स आणण्यासाठी तैनात करण्यात आली आहे.

यापैकी तलवार जहाजातून बहारिनमधून ४० मेट्रिक टन लिक्विड मेडीकल ऑ क्सिजन घेऊन येण्यात येत आहे. कोलकाता दोहाआणि कतार मधून आवश्यक वैद्यकीय साहित्यासह ऑक्सिजन टॅँकर घेऊन येत आहे.

ऐरावत हे जहाज ऑक्सिजन आणण्यासाठी सिंगापूरला पाठविले जाणार आहे. जलश्व हे जहाज आवश्यक साहित्याची वाहतूक करण्यासाठी तयार आहे. कोच्ची, त्रिकंड आणि तबर ही जहाजे अरबी समुद्रात तैनात करण्यात आली आहे.

भारतीय नौदलाचे प्रवक्ते कमांडंट विवेक मधवल यांनी सांगितले की नौदलाने ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी समुद्र सेतू हे अभियान सुरू केले आहे. गेल्या वर्षी नौदलाने परदेशात अडकलेल्या भारतीयांना वंदे भारत अभियानाअंतर्गत परत आणण्यासाठी समुद्र सेतू- २ हे अभियान यशस्वीपणे केले होते.

Operation Samudra Setu to supply naval, oxygen and medical supplies in the fight against the Corona

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था