अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी केंद्राचे ‘ऑपरेशन देवी शक्ती


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : हिंसाग्रस्त अफगाणिस्तानात अडकलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी केंद्र सरकारने मोहिम राबविली आहे. या मोहिमेला ‘ऑपरेशन देवी शक्ती’ असे नाव दिले आहे. ‘Operation Devi Shakti’ is Implemented For Rescue of Indians and Afgani citizen

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशनला ‘ऑपरेशन देवी शक्ती’ असे नाव दिले आहे. ऑपरेशनशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, निष्पाप लोकांना हिंसाचारापासून वाचवण्याचा हा एक प्रयत्न आहे, ज्याप्रमाणे ‘माँ दुर्गा’ निरपराध लोकांना राक्षसांपासून वाचवते, त्याचप्रमाणे काबूलमधून निष्पाप लोकांना वाचवण्यासाठी आणि सुरक्षित आणण्यासाठी हे ऑपरेशन राबविले आहे.

सुदानमधील भारतीयांना बाहेर काढण्यासाठी अशीच संकट मोचन सुरू राबविली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी दुर्गा देवीचे महान भक्त आहेत. ते नवरात्रात नऊ दिवस उपवास ठेवतात. नऊ दिवस, फक्त गरम पाणी पितात आणि कधीकधी एका वेळच्या आहारात फक्त एक फळ खातात.



नुकत्याच झालेल्या सीसीएस बैठकीत पंतप्रधानांनी मंत्रिमंडळाला निर्देश दिले होते की, अफगाण लोकांच्या बचाव कार्याला मानवी दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. ते म्हणाले की, केवळ हिंदू आणि शीख सारख्या अल्पसंख्यांकांना अफगाणिस्तानातून विविध विमानांनी परत आणले पाहिजे असं नाही, तर अनेक अफगाण नागरिकांनीही या संकटकाळात भारतात येण्याचा पर्याय निवडला आहे, त्यामुळे त्यांना परत आणण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाऊ नये.

तालिबानने वेढलेल्या काबूलच्या ताजिक शहरातून बाहेर काढल्यानंतर भारताने मंगळवारी आपल्या 25 नागरिकांना आणि अनेक अफगाणी शीख आणि हिंदूंसह 78 लोकांना दुशांबेमधून परत आणले. शीख धर्मग्रंथ, गुरु ग्रंथ साहिबच्या तीन प्रतींसह हा गट सोमवारी भारतीय हवाई दलाच्या लष्करी वाहतूक विमानाने काबूलहून दुशांबेला रवाना झाला. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि व्ही. मुरलीधरन यांनीही इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकांचे स्वागत केले.
मंगळवारच्या बचावकार्यानंतर, १६ ऑगस्टपासून दिल्लीला परत आणलेल्या लोकांची संख्या ८०० वर गेली आहे. तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी ताब्यात घेतल्याच्या एक दिवसानंतर पहिल्या तुकडीला काबूलहून विमानाने हलवले होते.

पुरी यांनी ट्विट केले की, “काही काळापूर्वी काबुल ते दिल्ली येथे श्री गुरु ग्रंथ साहिब जी यांचे तीन पवित्र स्वरूप प्राप्त करण्याचा आणि त्यांना अभिवादन करण्याचा बहुमान मिळाला.” एअर इंडियाच्या विमानाने दुशांबेहून लोकांना परत आणले. ऑपरेशन देवी शक्तीचा एक भाग म्हणून भारताने नाटो आणि अमेरिकेच्या विमानांनी काबूलमधून नागरिकांना बाहेर काढल्यानंतर काही दिवसांनी कतारची राजधानी दोहा येथून आपल्या १४६ नागरिकांना परत आणले.

पहिले निर्वासन विमानाने १६ ऑगस्टपासून

तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूल काबीज केले. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्यानंतर दोन दिवसातच भारताने अफगाणिस्तानच्या राजधानीतील भारतीय दूतावासातील इतर दूतावासातील कर्मचाऱ्यांसह २०० लोकांना बाहेर काढले. पहिल्या निर्वासन विमानाने १६ ऑगस्ट रोजी ४० हून अधिक लोकांना, बहुतेक भारतीय दूतावासाचे कर्मचारी परत आणले.ऑपरेशन संपलेले नाही आणि हे ऑपरेशन देवी शक्ती पुढील काही दिवस चालू राहण्याची अपेक्षा आहे.

‘Operation Devi Shakti’ is Implemented For Rescue of Indians and Afgani citizen

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात