प्रचारबंदीच्या काळात ममतांनी जपला पेंटिंगचा छंद


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज प्रचारबंदीच्या काळात आपला पेंटिंगचा छंद जोपासला. आज त्यांनी ना कोणत्या प्रचारसभेत भाग घेतला, ना कोठे रोड शो केला.On dharna against EC’s campaign ban, Mamata Banerjee takes to painting

ममता आज सकाळी त्यांनीच जाहीर केलेल्या कार्यक्रमाप्रमाणे कोलकात्यातील गांधीमूर्तीपाशी आल्या आणि त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. त्यावेळी त्या तिथे एकट्या होत्या. तृणमूळचे नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या आसपास दिसले नाहीत.थोडा वेळाने ममतांनी आपल्या जवळचा कॅनव्हास काढला आणि पेंटिंग करायला सुरूवात केली. त्या पेंटिंग करू लागताच काही उत्सुकतेने ते पाहण्यासाठी त्यांच्याजवळ आले. कोणी व्हिडिओ काढला. फोटो काढला पण त्यांच्या पेंटिंगच्य कामात कोणी व्यत्यय आणला नाही. ममतांनी थोड्या वेळात दोन पेंटिंग पूर्ण केली.

ममता बॅनर्जींना काव्य आणि पेटिंगचा छंद आहे. त्यांनी केलेली पेंटिंग आतापर्यंत लाखो रूपयांना विकली गेली आहेत. ममतांनी भले आज प्रचार केला नसेल. पण निवडणूकीच्या प्रचाराच्या धबडग्यात बंदीच्या निमित्ताने का होईना आपला पेंटिंगचा छंद मात्र पुरवून घेतला.

On dharna against EC’s campaign ban, Mamata Banerjee takes to painting

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण