काँग्रेसची न्याय योजना केरळमधून गरीबी चुटकीसरशी हटवेल; राहुल गांधींचे कोझीकोडमध्ये भरभरून आश्वासन

जीएसटी, पेट्रोल – डिझेल दरवाढ, कृषी कायदे यांच्याव्दारे मोदी तुमच्या खिशातला पैसा लुटताहेत, तो आम्ही तुमच्या खिशात भरू; राहुल गांधींचे आश्वासन Nyay yojana will destroy poverty in Kerala immediately. There will not be a single poor person in Kerala after Nyay is implemented, says rahul gandhi


वृत्तसंस्था

कोझीकोड – आसाममध्ये काँग्रेसच्या मित्र पक्षाचे नेते बद्रुद्दीन अजमल हे दाढी – टोपी – लुंगीवाल्यांचे सरकार आणायला निघाले असताना काँग्रेसचे नेते केरळच्या कोझीकोड़मध्ये आपल्या पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेची ग्वाही देत होते. त्याचवेळी त्यांनी मोदी सरकारवर जोरदार तोंडसुख घेतले. त्याचवेळी काँग्रेसची न्याय योजना केरळमधून गरीबी चुटकीसरशी हटवेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

राहुल गांधी म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला लुटत आहेत. जीएसटी, पेट्रोल – डिझेलची दरवाढ, महागाई, कृषी कायद्यांची अंमलबजावणी करून प्रत्येक वेळी तुमच्या खिशात हात घालत आहेत. तुमचे खिसे रिकामे करीत आहेत. पण मग तुमचे खिसे भरणार कोण… हे काम काँग्रेस करेल. आम्ही तुमचे खिसे भरू. गरीबांचे खिसे भरू. त्यालाच आम्ही न्याय योजना म्हणतो आहोत.काँग्रेसने २०१९ च्या निवडणूकीत गरीबांना दरमहा ६००० रूपये देण्याची म्हणजे वार्षिक ७२००० रूपये देण्याची योजना जाहीर केली होती. त्याला राहुल गांधींनी न्याय योजना असे नाव दिले होते. त्याच योजनेचा पुनरूच्चार राहुल गांधी यांनी कोझीकोडच्या सभेत केला.

काँग्रेसची न्याय योजना केरळमधून गरीबी ताबडतोब हटवेल. न्याय योजना लागू झाल्यावर केरळमध्ये एकही गरीब उरणार नाही. प्रत्येकाच्या खात्यात किमान ७२००० रूपये असतीलच असतील. मग गरीबी उरेलच कशी, असा सवाल राहुल गांधींनी केला.

Nyay yojana will destroy poverty in Kerala immediately. There will not be a single poor person in Kerala after Nyay is implemented, says rahul gandhi

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*