आता भारतीय सैनिकांनाही ऑपरेशनच्या वेळी मिळू शकणार मुख्यालयातून मार्गदर्शन

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली: अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा अमेरिकन सैनिकांनी कसा केला यावरील चित्रपट पाहिलाच असेल. त्यामध्ये ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांना मुख्यालयातून सूचना मिळत होत्या. आजुबाजूच्या धोक्याची कल्पनाही त्यांनी मॉनीटरवरील चित्र पाहून दिली होती.Now Indian soldiers will also be able to get guidance from the headquarters during the operation

आता भारतीय सैनिकांनाही त्याच प्रकारची सुविधा मिळू शकणार आहे. संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करातील जवानांसाठी ५५६ ऑगमेंटेड रिआलिटी हेड माऊंटेड डिस्प्ले सिस्टम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.अत्याधुनिक हेल्मेटच्या माध्यमातून खांद्यावरुन लाँच केल्या जाणाऱ्या मिसाइल सिस्टम आणि लँड बेस्ड एअर डिफेंस सिस्टमची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. याशिवाय रात्री होणाऱ्या दहशतवाद विरोधी मोहिमांमध्येही भारतीय सैनिकांना या हेल्मेटने मोठा फायदा होणार आहे.

खास पद्धतीनं डिझाइन करण्यात आलेल्या या हेल्मेटच्या माध्यमातून जवानांना रडार आणि थर्मल इमॅजिंक फोटोज मिळणार आहेत. याचा वापर करुन रात्रीच्या अंधारात जवानांना कोणत्याही वेळी आणि कोणत्याही मोसमात शत्रुवर हल्ला चढवता येणार आहे किंवा शत्रुचा अचूक वेध घेता येणार आहे.

हेड माऊंटेड डिस्प्ले म्हणजे एक डिस्प्ले डिव्हाइस असतं. हे हेल्मेटसारखं डोक्यावर परिधान करता येतं. याच्या समोरच्या बाजूस एक छोटासा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यापद्धतीनं गेमिंग स्टेशन, एव्हिएशन इंजिनिअरिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरण असतं. त्याचपद्धतीनं सैन्यातील जवानांसाठीचं हेल्मेट डिझाइन तयार करण्यात आलं आहे. अमेरिकेच्या सैन्याकडून या डिव्हाइसचा याआधीच वापर केला जात आहे.

Now Indian soldiers will also be able to get guidance from the headquarters during the operation

महत्त्वाच्या बातम्या