आता भारतातील पदवीला ऑस्ट्रेलियातही मान्यता, 11 सामंजस्य करारांमुळे तरुणांना परदेशात नोकरीचा मार्ग सुकर

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : तुम्ही भारतातील विद्यापीठातून पदवी घेत आहात. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियाला जाण्याचा प्लॅन आहे. तिथे जाऊन काहीतरी काम करावं लागेल. तर त्यासाठी वेगळा कोर्स करण्याची गरज भासणार नाही. कारण आता भारतीय विद्यापीठातून घेतलेली UG, PG पदवी ऑस्ट्रेलियातही वैध असेल. यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात करार करण्यात आला आहे. या अंतर्गत भारतीय व्यावसायिकांना ऑस्ट्रेलियात नोकरी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.Now Indian degrees are recognized in Australia too, 11 MoUs make it easier for young people to find jobs abroad

गुरुवारी दोन्ही देशांनी शैक्षणिक पात्रतेला परस्पर मान्यता देण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. आतापर्यंत भारताची पदवी ऑस्ट्रेलियात वैध नव्हती. या करारानुसार ऑस्ट्रेलियाचीही पदवी भारतात वैध असेल. दोन्ही देश एकमेकांची पदवी मान्य करतील. मात्र अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कायद्याची पदवी घेतलेल्या व्यावसायिकांना सध्या ही सुविधा मिळणार नाही.



कोणाला मिळणार लाभ?

अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि कायदा वगळता इतर सर्व यूजी आणि पीजी पदवी अभ्यासक्रमांना या कराराचा लाभ मिळणार आहे. लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे तुमची पदवी UGC मान्यताप्राप्त संस्थेतून असावी. मात्र, यासंदर्भात सविस्तर माहिती अद्याप आलेली नाही.

UGC चे अध्यक्ष जगदीश कुमार म्हणाले, “भारतीय उच्च शिक्षण व्यवस्थेत सुधारणा कशा राबवल्या जात आहेत याबद्दल आम्ही सविस्तर चर्चा केली. आम्ही भारतातील परदेशी विद्यापीठांच्या कॅम्पसवरील UGCच्या मसुद्याच्या नियमांवरही चर्चा केली. आम्ही सहमत झालो की हे नियम भारत आणि ऑस्ट्रेलियाला एकत्र काम करण्याची उत्तम संधी देतात.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्यांच्या भेटीवर आलेले ऑस्ट्रेलियाचे शिक्षण मंत्री जेसन क्लेअर यांच्या भेटीनंतर या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांमध्ये किमान 11 करार झाले आहेत. याअंतर्गत अनेक प्रमुख क्षेत्रांत दोन्ही देशांमधील परस्पर सहकार्य वाढवले जाईल. यामध्ये संशोधन आणि शैक्षणिक कार्य यांचा समावेश आहे.

दरम्यान, क्लेअर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह 30 सदस्यीय पथकाने येथील विद्यापीठ अनुदान आयोगाला (यूजीसी) भेट दिली. या भेटीत 10 हून अधिक ऑस्ट्रेलियन विद्यापीठांचे कुलगुरू आणि इतर उच्च शिक्षण अधिकारी सहभागी झाले होते.

Now Indian degrees are recognized in Australia too, 11 MoUs make it easier for young people to find jobs abroad

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात