GST Collection : नोव्हेंबरच्या GST संकलनाने रचला ऐतिहासिक विक्रम, १.३१ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार

नोव्हेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1,31,526 कोटी रुपये होते. या महिन्यातील जीएसटी संकलन गेल्या महिन्याच्या संकलनापेक्षा जास्त आहे, जीएसटी लागू झाल्यानंतरचा दुसरा उच्चांक आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. हा आकडा जीएसटी लागू झाल्यानंतरचा दुसरा उच्चांक आहे. November GST collection crosses Rs 1.31 lakh crore mark


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1,31,526 कोटी रुपये होते. या महिन्यातील जीएसटी संकलन गेल्या महिन्याच्या संकलनापेक्षा जास्त आहे, जीएसटी लागू झाल्यानंतरचा दुसरा उच्चांक आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे. हा आकडा जीएसटी लागू झाल्यानंतरचा दुसरा उच्चांक आहे.

ऑक्टोबरमध्ये विक्रमी संकलन

नोव्हेंबरमधील जीएसटी संकलनाने ऑक्टोबरमधील विक्रम मोडला आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर महिन्यात एकूण जीएसटी संकलन 1,30,127 कोटी रुपये होते. गेल्या महिन्यात, सणासुदीच्या हंगामामुळे मागणीत झालेली वाढ जीएसटी संकलनात स्पष्टपणे दिसून आली, जी आत्तापर्यंत सुरू आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये एकत्रित GST महसूल 1,31,526 कोटी रुपये आहे, ज्यामध्ये CGST 23,978 कोटी रुपये, SGST रुपये 31,127 कोटी, IGST रुपये 66,815 कोटी (वस्तूंच्या आयातीवर गोळा केलेल्या 32,165 कोटी रुपयांसह) आणि उपकर यांचा समावेश आहे.

गेल्या वर्षीपेक्षा 25% जास्त

बुधवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर 2020च्या तुलनेत नोव्हेंबर महिन्याचा GST महसूल 25 टक्के अधिक आहे आणि नोव्हेंबर 2019 च्या तुलनेत 27 टक्के अधिक आहे. CGST म्हणजे केंद्रीय वस्तू आणि सेवा कर, SGST म्हणजे राज्य वस्तू आणि सेवा कर आणि IGST म्हणजे एकात्मिक वस्तू आणि सेवा कर असतो.

2017 मध्ये GST देशभरात लागू

वस्तू आणि सेवा कर (GST) जुलै 2017 मध्ये लागू करण्यात आला. तेव्हापासून सर्वाधिक संकलन १.४१ लाख कोटी रुपये झाले आहे. हा विक्रम यावर्षी एप्रिलमध्ये होता. ऑक्टोबरमध्ये एकूण 7.35 कोटी ई-बिले उत्पन्न झाली. याचा अर्थ त्याचा पैसा नोव्हेंबरमध्ये सरकारकडे आला आहे.

November GST collection crosses Rs 1.31 lakh crore mark

महत्त्वाच्या बातम्या