वृत्तसंस्था
अमृतसर – पक्षश्रेष्ठींनी लक्ष घातल्यानंतर पंजाब काँग्रेसमधला वाद शमण्याऐवजी जास्तच उफाळला आहे. आतापर्यंत काँग्रेसचे कोणतेही पद मिळत नव्हते म्हणून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर आगपाखड करणाऱ्या नवज्योत सिंग सिध्दू यांनी आता थेट पक्षश्रेष्ठींवरच हल्लाबोल केला आहे.Not Amarinder Singh, but now directly to Congress stalwarts Navjyot Singh Sidhu “voice”; Said, if I am not allowed to make a decision, then I will play brick by brick … !!
वास्तविक कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात जाऊन पक्षश्रेष्ठींनी नवज्योत सिंग सिध्दू यांना प्रदेशाध्यक्ष केले आहे. पण आता त्यांनी एका जाहीर कार्यक्रमात मला निर्णय घेऊ दिले नाहीत, तर एकेकाची ईट से ईट बजा दुंगा अशी धमकीच देऊन टाकली आहे. ही धमकी त्यांनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यापेक्षा त्यांना प्रदेशाध्यक्ष करणाऱ्या काँग्रेसश्रेष्ठींनाच दिल्याचे दिसते आहे. सिध्दू यांच्या धमकीभरल्या भाषणाचा विडिओ व्हायरल झाला आहे.
दुसरीकडे सिध्दू यांनी नेमलेले सल्लागार मालविंदर सिंग माली यांनी आपला सल्ला मागे घेतला आहे. त्यांनी काश्मीरबाबत वादग्रस्त विधान केले होते. काश्मीर स्वतंत्र असताना भारत आणि पाकिस्तान यांनी बेकायदेशीररित्या त्याच्यावर कब्जा मिळविल्याचा आरोप त्यांनी केला होता.
#WATCH:"… If you don't let me take decisions, I won't spare… (ent se ent baja dunga)…": Punjab Congress chief Navjot Singh Sidhu pic.twitter.com/1KeMuPBlZy — ANI (@ANI) August 27, 2021
#WATCH:"… If you don't let me take decisions, I won't spare… (ent se ent baja dunga)…": Punjab Congress chief Navjot Singh Sidhu pic.twitter.com/1KeMuPBlZy
— ANI (@ANI) August 27, 2021
आता त्यावर बरेच चर्वित चरण झाल्यानंतर मालविंदर सिंग माली यांनी आपण तो सल्ला मागे घेत असल्याचे पत्रक काढून सांगितले आहे. काँग्रेसचे प्रभारी हरिष रावत यांनी या प्रकरणावर पडदा पडल्याचा दावा केला आहे.
पण नवज्योत सिंग सिध्दू यांच्या धमकीभरल्या भाषणाबद्दल ते ऐकल्याशिवाय मी त्यांना जाब विचारू शकत नाही, असे हरिष रावत यांनी म्हटले आहे. पण आता हे भाषण व्हायरल झाल्याने त्यावर ते काय प्रतिक्रिया देतात याची प्रतिक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App