नारायण राणेंच्या अटकेचा संदर्भ नाही, पण सर्वोच्च न्यायालय म्हणते पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कलाने काम करतात हे उद्वेगजनक


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अदखलपात्र गुन्ह्याासाठी अटक करताना पोलीस दलाला कशा पध्दतीने वेठीला धरले हे महाराष्ट्राने पाहिले. नारायण राणे यांच्या अटकेचा संदर्भ नसला तरी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधिश एन. व्ही. रमण यांनी दुसऱ्या एका प्रकरणात टिप्पणी करताना म्हटले आहे की पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कलाने काम करतात. सत्ताबदलानंतर नवा सत्तारूढ पक्ष संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करतो, हे प्रकार वाढले आहेत. हे चित्र उद्वेगजनक आहे.No reference to Narayan Rane’s arrest, but Supreme Court says it is disturbing that police officers work with the art of the authorities

छत्तीसगड पोलीस अकॅडमीचे निलंबित संचालक, आयपीएस अधिकारी गुरजिंदरपाल सिंह यांच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पोलीस अधिकारी आणि सत्ताधारी यांच्यातील हितसंबंधांवर भाष्य केले. भाजप काळात रायपूर, दुर्ग आणि बिलासपूरचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केलेल्या गुरजिंदरपाल सिंह यांच्याविरोधात छत्तीसगडमधील विद्यमान काँग्रेस सरकारने जूनमध्ये बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला.



सिंह यांनी अतिरिक्त पोलीस महासंचालकासह महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मात्र, त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला आहे, असे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. सिंह यांना चार आठवडे अटक करू नये, असे निर्देश देताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांच्या खंडपीठाने सत्ताबदलानंतर राजद्रोहाच्या गुन्हेनोंदीच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली.

न्या. रमण म्हणाले, देशात अस्वस्थ करणारी स्थिती आहे. त्यास पोलीस खातेही जबाबदार आहे. एखादा राजकीय पक्ष सत्तेवर असतो तेव्हा पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या कलाने काम करतात आणि प्रतिस्पर्धी पक्ष सत्तेवर आल्यानंतर अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करतो. हे थांबले पाहिजे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या अदखलपात्र गुन्ह्यासाठी पुणे आणि नाशिक पोलीसांनी पथके पाठविली होती. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी तर पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांना अटक करण्यात येणार असल्याचे म्हटले होते.

शिवसैनिकांच्या भावना दुखावल्याची तक्रार आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गुन्ह्याचा प्रकार आणि गांभीर्य बघता नारायण राणे यांना अटक करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. राणेंनी आपलं निर्दोषत्व न्यायालयात सिद्ध करावे. मात्र महाड न्यायालयानेच चपराक दिल्याने नाशिक आणि पुणे पोलीसांच्या पथकांना हात हलवित परत यावे लागले होते.

No reference to Narayan Rane’s arrest, but Supreme Court says it is disturbing that police officers work with the art of the authorities

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात