चीनशी लष्करी समझोता नाही; रशियन परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची भारतात येऊन ग्वाही; रशियन संरक्षण साहित्य उत्पादनाचे “मेक इन इंडियाला” बळ!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – चीनशी सध्या किंवा भविष्यात कोणताही लष्करी समझोता केला जाणार नाही, अशी ग्वाही रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आज दिली. लावरोव्ह सध्या भारत दौऱ्यावर आले असून त्यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या समवेत शिष्टमंडळ स्तरीय बातचित केली. No’ military alliance with China, says Russian Foreign Minister

भारत – रशिया यांच्यातील व्यापक सहकार्यावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. रशिया – चीन संबंधांवर लावरोव्ह यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असताना ते म्हणाले, की रशिया – चीन संबंध सध्या उत्तम आहेत. विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य देखील वाढते आहे. पण याचा अर्थ असा नाही, की रशिया – चीन यांच्यात लष्करी सहकार्याचा समझोता होईल. या समझोत्याची अफवाच पसरली आहे. तशीच अफवा रशिया – नाटो समझोत्याची किंवा आशियायी नाटो संकल्पनेची पसरली होती. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांसमवेत या विषयावर व्यापक चर्चा झाली आहे.

भारत – रशिया लष्करी सहकार्य या विषयावर आम्ही भर दिला. मेक इन इंडिया संकल्पनेला बळ देणारे समझोते करण्याकडे आमचा कल आहे. रशियन लष्करी साहित्याचे भारतात उत्पादन करण्याच्या दृष्टीने आम्ही सकारात्मक प्रयत्न करीत आहोत. त्या विषयावर आमची चर्चा झाली. रशियन टॅंक आणि रडार सिस्टिम याबद्दल दोन्ही देशांचे संरक्षणमंत्री स्वतंत्र चर्चा करतील, याची जाणीव भारताचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी करवून दिली.

रशिया – चीन, रशिया – अमेरिका आणि भारत – रशिया यांचे संबंध हे खूप वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यांचे आयाम पूर्णपणे वेगळे आहेत. त्यांची एकमेकांमध्ये गुंतागुंत करण्याची गरज नाही, याकडे रशियन परराष्ट्र मंत्र्यांनी लक्ष वेधले.

No’ military alliance with China, says Russian Foreign Minister


इतर बातम्या वाचा…

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*