विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद – गावात कोरोना विषाणूचा प्रवेश होऊ नये म्हणून काढण्यात आलेल्या धार्मिक मिरवणुकीत सहभागी झाल्याबद्दल ८० पेक्षा जास्त नागरिकांना अटक करण्यात आली. साबरकांठा जिल्ह्यातील प्रांतीज तालुक्यातील लालपूरमध्ये गेल्या शनिवारी (२२ मे) रोजी हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. No follow rule of lockdown in procession
पोलिसांना मिरवणुकीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अखेर याचा पत्ता लागला. त्यानंतर ओळख पटलेल्या २८ जणांविरुद्ध आणि शंभरहून जास्त अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर कारवाई सुरु असून कोरोना निर्बंधांचे उल्लंघन केल्याबद्दल गेल्या दोन दिवसांत ८३ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. महिलांसह सहभागी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एक विधी करण्यासाठी ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत काही लोकांनी ढोल वाजविले, तर महिलांसह काही जणांनी डोक्यावर कलश घेतले होते. त्यातील पाणी पवित्र असल्याची त्यांची श्रद्धा होती. याआधी अहमदाबाद जिल्ह्यात या महिन्याच्या प्रारंभी नवापुरा गावात असाच प्रकार आढळला होता. येथे काढलेल्या मिरवणुकीत हजारो लोक सहभागी झाले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App