देशात जातीनिहाय जनगणना एकदा तरी व्हायलाच हवी, मुख्यमंत्री नितीशकुमार धरणार मोदींकडे आग्रह

विशेष प्रतिनिधी

पाटणा – देशात एकदा तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, याचा पुनरुच्चार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केला आहे. Nitish Kumar will meet PM modi tomarrow

जातीनिहाय जनगणनेबद्दल ते म्हणाले, “हा महत्त्वाचा मुद्दा आहे. एकदा तरी जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. हे केवळ बिहारचे मत नाहीये, तर संपूर्ण देशाचे मत आहे. त्यामुळे उद्या पंतप्रधानांसमोर मी हा मुद्दा उपस्थित करणार आहे.

जातीनिहाय जनगणनेचा निर्णय केंद्राने घेतला नाही, तर राज्यात स्वतंत्रपणे तशी जनगणना करण्याचा विचार केला जाईल, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. परंतु, पंतप्रधान याबाबत सकारात्मक भूमिका घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.



जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी नितीशकुमार उद्या पंतप्रधानांना भेटणार आहेत. या शिष्टमंडळामध्ये मंत्री विजय चौधरी, जनक राम, ‘हम’चे अध्यक्ष जीतनराम मांझी, ‘व्हीआयपी’चे अध्यक्ष मुकेश साहनी हेही असतील. त्यांच्याबरोबर तेजस्वी यादव आणि डाव्या पक्षांचे नेतेही असतील. काँग्रेसचे नेते अजित शर्मा यांचाही समावेश या शिष्टमंडळात असणार आहे.

Nitish Kumar will meet PM modi tomarrow

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात