वृत्तसंस्था
समस्तीपूर : दोनदा भाजपबरोबर आयाराम – गयाराम करणारे नीतीश कुमार म्हणालेत यापुढे भाजपबरोबर कधीच जाणार नाही!!… समस्तीपुर मध्ये सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजच्या उद्घाटन समारंभात नितीश कुमार बोलत होते.Nitish Kumar claimed, he will never go with BJP again, but it was he, who twice formed the government with BJP in bihar
नितीश कुमार यांनी केंद्रातील मोदी सरकारवर यावेळी सडकून टीका केली. परंतु, ती करताना त्यांनी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची अफाट स्तुती देखील केली. या तीनही नेत्यांनी देशासाठी खस्ता खाल्ल्या. खूप मोठे काम केले. परंतु, सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्या नेत्यांना देशाच्या विकासाशी काहीही देणे घेणे नाही. त्यांना फक्त आपली एकाधिकारशाही देशावर लादायची आहे, असा आरोप नितीश कुमार यांनी केला. त्याचवेळी त्यांनी भाजपबरोबर इथून पुढे केव्हाही जाणार नाही अशी घोषणा केली.
हेच ते नितीश कुमार आहेत, ज्यांनी दोनदा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली. बिहारमध्ये बहुमत मिळवले आणि सत्तेवर आले. त्यानंतर त्यांनी भाजपशी संबंध तोडून ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्या लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबर आघाडी करून आपली सत्ता टिकवली.
2017 मध्ये देखील त्यांनी अशीच भाजप बरोबर कधीच जाणार नाही, अशी घोषणा केली होती. पण त्यानंतर 2020 मध्ये भाजपशी आघाडी करून त्यांनी निवडणूक लढवली आणि ते पुन्हा सत्तेवर आले होते. 14 ऑक्टोबर 2022 रोजी समस्तीपुर मध्ये त्यांनी परत एकदा तशीच भाजपबरोबर जाणार नसल्याची घोषणा केली आहे. पण बिहार विधानसभेची निवडणूक 2025 मध्ये आहे. तेव्हा नितीश कुमार नेमकी कोणती भूमिका घेतात?, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App