जयप्रकाश नारायण, लोहियांना अभ्यासक्रमातून वगळल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार संतापले

वृत्तसंस्था

पाटणा : बिहारमधील एका विद्यापीठाने राज्यशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातून ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राममनोहर लोहिया व जयप्रकाश नारायण यांचे विचार वगळल्याने मुख्यमंत्री नितीशकुमार चांगलेच संतापले आहेत. या प्रकरणी सरकारने तातडीने पावले उचलत विद्यापीठाकडे विचारणा केली आहे. Nitish Kumar angry over University syllabus issue

सारण जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण विद्यापीठाने अभ्यासक्रम वगळण्याचा निर्णय घेतला आहे. बिहारचे शिक्षणमंत्री विजय कुमार चौधरी म्हणाले, जयप्रकाश नारायण यांच्याविषयी राज्याच्या भावना तीव्र आहेत. प्रशासनाला विश्वासात न घेता अशा प्रकारचा कोणताही बदल केला जाऊ नये. राज्यपाल व विद्यापीठांचे कुलपती फगू चौहान यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित करणार आहे.



हा शिक्षणाचे भगवेकरण करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दूरध्वनी करून याबाबत नाराजी व्यक्त केली. नवीन शैक्षणिक धोरण अमलात आणल्यानंतर २०१८ मध्ये तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीवरून राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात बदल केल्याचे विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Nitish Kumar angry over University syllabus issue

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात