नितीन गडकरी म्हणतात, कॉँग्रेस पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणार म्हणते ही दिशाभूल, कारण आता वाहन चालणार इलेक्ट्रिक किंवा इथेनॉलवर


विशेष प्रतिनिधी

पणजी : काँग्रेस ८० रुपयांच्यावर पेट्रोल-डिझेल दर जाणार नाहीत, असे आश्वासन देत आहे. परंतु ते लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण आता इलेक्ट्रिक तसेच इथेनॉलवर चालणारी वाहने येऊ घातली आहेत. त्यामुळे पेट्रोलची गरजच भासणार नाही. बसगाड्याही पर्यायी इंधनावर धावतील.Nitin Gadkari says Congress says it will reduce petrol-diesel rates is misleading, as vehicles will now run on electric or ethanol

इथेनॉल ६२ रुपयांना उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पेट्रोलची गरजच भासणार नाही. काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, अस आरोप केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.
गडकरी म्हणाले, मोदी सरकारने गोव्याला भरभरून दिले. राष्ट्रीय महामार्गांची पाच ते सहा हजार कोटींची कामे पूर्ण झालेली आहेत.



पंचवीस हजार कोटी आधी मंजूर केले होते. त्यात आणखी पंधरा हजार कोटी मंजूर झाले आहेत.मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, २०१७ च्या निवडणुकीत भाजपने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी ८० टक्के कामे आम्ही पूर्ण केली. या नव्या जाहीरनाम्याचे रिपोर्ट कार्ड आम्ही देणार आहोत.

अनेक राजकीय पक्ष गोव्यात आलेले आहेत आणि गोव्यात खाते उघडण्याच्या मोहापायी खोट्या आश्वासनांचा पाढा वाचत आहे. काही पक्ष टेकू घेऊन सरकार स्थापन करण्याची स्वप्ने पाहत आहेत. विरोधी कॉंग्रेस पक्षाने २००७ साली जाहीरनाम्यात जी आश्वासने दिली होती, त्यातील किती पाळली हे दिगंबर कामत यांनी जाहीर करावे. काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे झाले, याची यादी आमच्याकडे आहे.

भाजपने आपल्या जाहीरनाम्यात वर्षाकाठी तीन एलपीजी गॅस सिलिंडर मोफत, गोवा खनिज विकास महामंडळामार्फत लोह खनिज ब्लॉकचा लिलांव सहा महिन्यात खाण व्यवसाय सुरू करणार, दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेचे मानधन दोन हजारवरुन वाढवून तीन हजार रुपये करणार,

घर बांधण्यासाठी गरिबांना दोन टक्के व्याजाने कर्ज तसेच भूखंड, पेट्रोल, डिझेलवरील शुल्क वाढणार नाही, पर्रीकर कल्याण निधी अंतर्गत पंचायतींना तीन कोटी रुपये तर पालिकांना पाच कोटी निधी, पर्यटकांसाठी होम स्टे व्यवस्था करणाऱ्यांना पाच लाखांचे बिनव्याजी कर्ज आदी आश्वासने दिली आहेत.

Nitin Gadkari says Congress says it will reduce petrol-diesel rates is misleading, as vehicles will now run on electric or ethanol

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात