देशात तब्बल पावणे दोन लाख लोक व्हेंटिलेटवर तर नउ लाख रुग्ण ऑक्सीजनवर


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशात यावेळी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज लागली आहे. अजूनही देशभरात नऊ लाखांहून जास्त कोरोनाग्रस्त केवळ ऑक्सिलजनच्या आधारावरच जगत आहेत. Nine lack people are on oxygen support

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीचा उच्चस्तरीय बैठकीत ही माहिती दिली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी, रेल्वेमंत्री पियुष गोयल आदींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत कोरोना निर्मूलनाबाबत प्रत्येक मंत्रालयाने घेतलेल्या पुढाकाराची चर्चा करण्यात आली.



कोरोना निर्मूलन मोहिमेच्या आंतरमंत्रिगटाच्या बैठकीत बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशभरात ९ लाख २ हजार २९१ रुग्ण अजूनही ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. देशात १ लाख ७० हजार ८४२ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. एकूण रुग्ण संख्येच्या १.३४ टक्के रुग्णांवर अतिदक्षता विभागात आणि ३.७० टक्के रुग्णांवर ऑक्सिजन सपोर्टच्या साह्याने उपचार सुरू आहेत.

कोरोनापासून संपूर्ण बचावासाठी लशीचा दुसरा डोस घेणे आवश्यक आहे आणि याबाबत केंद्र सरकार जनजागृती मोहीम राबवत आहे, अशीही माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.

Nine lack people are on oxygen support

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात