टेरर फंडिंगविरोधात NIAची पुन्हा कारवाई : पंजाब, हरियाणा, दिल्लीसह 70 ठिकाणी टाकले छापे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गँगस्टर टेरर फंडिंग प्रकरणांबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. यावेळी एनआयएच्या पथकाने 70 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली, चंदीगड, पंजाब, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. हे छापे टेरर फंडिंगसंदर्भात गुंड आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर टाकण्यात आले आहेत.NIA again action against terror funding raids conducted at 70 places including Punjab, Haryana, Delhi

एनआयएची ही छापेमारी एकाच वेळी सर्व ठिकाणी केली जात आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा गुंडांच्या चौकशीदरम्यान आणखी अनेकांची नावे समोर आली आहेत. NIA चौकशीत गुंडांच्या घरांवर आणि त्यांच्याशी आणि त्यांच्या साथीदारांशी संबंधित इतर ठिकाणांवर छापे टाकत आहे. गुंडांचे अन्य देशांत संपर्क असल्याची बाब समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. लॉरेन्स बिश्नोई आणि बवाना टोळीच्या नावाने भारतात दहशतीसाठी भरपूर निधी मिळतो.



यापूर्वीच्या कारवाईत, एनआयएने बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) अटक केलेल्या सर्व गुंडांची चौकशी केली होती. यानंतर एनआयएच्या हाती पाकिस्तान-आयएसआय आणि गुंडांच्या संगनमताची अनेक माहिती आली आहे. त्याआधारे पुन्हा एकदा अड्ड्यांवर छापे टाकण्यात येत आहेत.

एजन्सीने अनेकदा टाकले छापे

देशविरोधी कारवाया करण्यासाठी गुंडांचा कसा वापर केला जातो, याचा केंद्रीय तपास यंत्रणा शोध घेत आहे. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने आतापर्यंत गँगस्टर-टेरर फंडिंग प्रकरणात तीन छापे टाकले आहेत. याआधीही गेल्या वर्षाच्या अखेरीस दिल्ली-एनसीआरसह देशातील अनेक राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकण्यात आले होते.

NIA again action against terror funding raids conducted at 70 places including Punjab, Haryana, Delhi

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात