विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मंत्रीमंडळातील सर्वात तरुण मंत्री असलेले गृह राज्यमंत्री आणि पश्चिम बंगालमधील खासदार निशीथ प्रमाणिक मंत्री झाल्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह कॉँग्रेसचा चांगलाच तिळपापड झाल आहे. त्यामुळे प्रमाणिक हे बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा आसाममधील काँग्रेसचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष रिपून बोरा यांनी केला आहे.New Home Minister for state Nishith Pramanik is accused of being a Bangladeshi national
पंतप्रधानांना लिहलेल्या पत्रात त्यांनी प्रमाणिक यांचे जन्म ठिकाण आणि राष्ट्रीयता तपासण्याची मागणी आपल्या पत्राव्दारे केली आहे. आता तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरला आहे. खासदार बोरा यांनी काही माध्यमांचा हवाला देत प्रमाणिक हे बांगलादेशी नागरिक असल्याचे सांगितले होते.
त्यासोबतच परदेशी नागरिक हे देशाचे केंद्रीय मंत्री आहेत ही किती गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचे म्हणाले होते.खासदार बोरा यांच्या या मागणीचे काही नेत्यांनी समर्थन केले आहे. परंतु, भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहे.
त्यांनी यासंदर्भांत पुरावे द्यावे. केवळ बोट दाखवणे पुरेसे नाही. गृह राज्यमंत्री प्रमणिक यांच्या नागरिकत्वाच्या संदर्भात अद्याप कोणी पुरावे सादर केलेले नाहीत, असे पश्चिम बंगाल मधील पक्षाचे प्रवक्ते समिक भट्टाचार्य यांनी म्हटले आहे. असेही ते म्हणाले.निशिथ प्रमाणिक यांच्या नागरिकत्वावर सर्वात आधी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टने वाद सुरु झाला होता.
प्रमाणिक यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यावर बांगलादेशातील गायबंधा जिल्ह्यातील हरिनाथपूरचा यशस्वी मुलगा’ असे त्यांचे वर्णन त्या पोस्टमध्ये करण्यात आले होते. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये संगणक शास्त्राचे शिक्षण घेतल्याचेही उल्लेख या पोस्टमध्ये केले गेले होते. हे पोस्टर पूजार मेळा नावाच्या एका संघटनेने शेअर केले असून ते स्वत:ला बांगलादेशमधील धार्मिक संघटन असल्याचे सांगतात. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App