भूक लागल्यावर मॅगी, किटकॅट, मंच खाता. पण थांबा हे आपल्याला वाटते तितके हेल्दी नाही. कंपनीच्याच अंतर्गत अभ्यासात नेस्लेची बहुतांश उत्पादने हेल्दी नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे जगातील पॅकजड अन्नाची सर्वात मोठी कंपनी असलेली नेस्ले पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या कंपनीची बहुतांश उत्पादने हेल्दी नसून आरोग्यपूर्ण नसल्याचे एका अहवालात म्हटले आहे. त्यामुळे कंपनीने आता या उत्पादनांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.Nestle’s products are not healthy, according to the company’s report
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भूक लागल्यावर मॅगी, किटकॅट, मंच खाता. पण थांबा हे आपल्याला वाटते तितके हेल्दी नाही. कंपनीच्याच अंतर्गत अभ्यासात नेस्लेची बहुतांश उत्पादने हेल्दी नसल्याचे म्हटले आहे.
त्यामुळे जगातील पॅकजड अन्नाची सर्वात मोठी कंपनी असलेली नेस्ले पुन्हा एकदा वादाच्या भोवºयात सापडली आहे. या कंपनीची बहुतांश उत्पादने हेल्दी नसून आरोग्यपूर्ण नसल्याचे एका अहवालात म्हटले आहे.
त्यामुळे कंपनीने आता या उत्पादनांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.एका अहवालात म्हटले आहे की नेस्लेची बहुतांश अन्न आणि पेय उत्पादने आरोग्यासाठी हानीकारण आहे.
विशेष म्हणजे हा अहवाला कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. यामध्ये म्हटले आहे की नेस्लेची किमान ६० टक्के उत्पादने ही आरोग्याच्या निकषावर आरोग्यपूर्ण नाहीत.
काही उत्पादने ही आरोग्यासाठी कधीच चांगली नव्हती. आपण कितीही चांगल्या पध्दतीने तयार करण्याचा प्रयत्न केला तरी काही उत्पादने कधीच हेल्दी नव्हती, असेही या अहवालात म्हटले आहे.
मेडीकल न्युट्रिशन, पेट फूड, कॉफी आणि बालकांसाठीच्या उत्पादनांचा अभ्यास या अहवालात करण्यात आलेला नाही.ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य निकषानुसार नेस्लेच्या ३७ टक्के उत्पादनांना पाचपैकी साडेतीन स्टार मिळाले आहेत.
साडेतीन स्टार मिळणे म्हणजे आरोग्यासाठी परिपूर्ण उत्पादन असल्याचे मानले जाते. परंतु, ७० टक्के अन्न उत्पादने आणि कॉफी व्यतिरिक्त ९६ टक्के पेय उत्पादने आरोग्यपूर्ण असल्याचा निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहेत. केवळ पाणी आणि दुग्धजन्य पदार्थच आरोग्य निकषावर उत्तीर्ण झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App