विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या एकाधिकारशाहीला त्यांचा भाचा आणि पक्षाचे सरचिटणिस खासदार अभिषक बॅनर्जीही कंटाळले आहेत. कोरोनावर उपाययोजनेवरून लावण्याच्या निर्बंधावरून दोघांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.Nephew Abhishek also fed up with Mamata Banerjee’s dictatorship, differences over corona measures
सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या लाटेत सर्व धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम पुढे ढकलले जावेत असे अभिषेक बॅनर्जी यांचे मत आहे. मात्र, ममता बॅनर्जी ज्या राज्याच्या आरोग्य मंत्रीही आहेत त्यांचा याला विरोध आहे. या मुद्यावरून पक्षामध्येही उभी फूट असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ममता बॅनर्जी सरकारने गेल्या आठवड्यात लाखोंच्या उपस्थितीत असणारा गंगा सागर मेळा रद्द करण्यास नकार दिला होता. ममता सरकार नागरी निवडणुका घेण्यास उत्सुक होते. गेल्या महिन्यातही मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते की, अर्थव्यवस्थेवर होणाºया परिणामामुळे सरकार शक्य तितके निर्बंध लादणे टाळेल.
मात्र, अभिषेक बॅनर्जी यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. 8 जानेवारी रोजी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात, डायमंड हार्बरमध्ये प्रशासकीय बैठक आयोजित करताना, ते म्हणाले मला असे वाटते की पुढील दोन महिने सर्व धार्मिक आणि राजकीय कार्यक्रम स्थगित केले पाहिजेत. हे माझे वैयक्तिक मत आहे.
अभिषेकने ट्विट करून नागरी निवडणुका पुढे ढकलल्याबद्दल कलकत्ता उच्च न्यायालय आणि राज्य निवडणूक आयोगाचे आभार मानले आहेत. पुढच्या तीन आठवड्यांत बंगालमधील सकारात्मकता दर 3 टक्क्यांपेक्षा कमी होईल याची खात्री करण्यासाठी आपण एकजुटीने काम करूया,असे ट्विट त्यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App