सागरी चाचेगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या एडनच्या आखातात आता नौदलाचा सराव

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतीय तसेच युरोपीय महासंघाच्या नौदलांच्या पहिल्यावहिल्या कवायती एडनच्या आखातात आजपासून सुरू झाल्या. एडनचे आखात सागरी चाचेगिरीसाठी ओळखले जाते. या भागातून प्रवास करणाऱ्या विविध देशांच्या मालवाहू जहाजांना चाच्यांपासून मोठा धोका असतो. त्या ठिकाणीच आता या कवायती सुरु झाल्या आहेत.Navy exercise in Gulf of Aden

भारत, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांच्या युद्धनौका या कवायतींत सहभागी आहेत. सागरी चाचेगिरीविरोधी कारवाया तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्नसुरक्षा योजनेनुसार नियुक्त केलेल्या जहाजांचे संरक्षण यासाठीही युरोपीय समुदायाचे नौदल आणि भारतीय नौदल यांच्यातर्फे एकत्रित प्रयत्न केले जातात.आखातातील ‘बहरिन’ या देशाबरोबरही या दोनही नौदलांचा नियमित संपर्क असतो. अशा सततच्या कवायतींमुळे या दोनही नौदलांमधील सहकार्य वाढेल, अशी अपेक्षा आहे.इटालियन युद्धनौका कॅरेबिनेर, स्पेनची ‘नावाराही’ युद्धनौका तसेच ‘तोन्नेर’ आणि ‘स्यूरकूफ’ या फ्रान्सच्या दोन युद्धनौका या कवायतीत भाग घेत आहेत.

हवाई हल्ल्यांपासून ताफ्याचे रक्षण करणे तसेच पाणबुडीविरोधी हल्ल्याचे युद्धतंत्र घोटवून घेणे याचा सराव या वेळी होईल. त्याचप्रमाणे आणीबाणीच्या प्रसंगी एकमेकांच्या युद्धनौकांवर एकमेकांची हेलिकॉप्टर उतरवणे, व्यूहरचनात्मक हालचाली करणे, शोध आणि बचाव मोहीम तसेच अन्य सागरी युद्धतंत्रांचा सराव या वेळी होईल.

Navy exercise in Gulf of Aden

महत्त्वाच्या बातम्या