विशेष प्रतिनिधी
अमृतसर : पंजाबमधील कॉँग्रेसचे दोन दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू आणि सुनील जाखड निवडणुकीनंतर एकत्र आले आहेत. पक्षश्रेष्ठींना धक्का देण्याची त्यांची तयारी असल्याचे बोलले जात आहे. नवज्योत सिंग सिद्धू मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असते तर परिवर्तनाचे वादळ थांबू शकले असते, असे सुनील जाखड यांनी म्हटले आहे.Navjyot Singh Sidhu-Sunil Jakhar together in Punjab, ready to push the party leaders
काँग्रेसच्या पराभवावर सुनील जाखड वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, नवज्योतसिंग सिद्धू यांना संधी दिली असती, त्यांच्यावर कॅ. अमरिंदर सिंग यांच्यासारखे भ्रष्टाचाराचे आरोप झाले नसते, त्यांच्यावर बादलांशी संगनमत केल्याचा आरोप झाला नसता. मला वाटते सिद्धू हे बदल थांबवू शकले असते. आम्ही रोगाचे आकलन बरोबर केले असले तरी रोगावरील औषध चुकीचे होते.
लोकांना बदल हवा होता. काही लोक मला अपमानित करण्याचा प्रयत्न करीत होते. ते सर्व मुख्यमंत्री झाले होते. परंतु, आता ते स्वत:च विहिरीत पडले आहेत. पंजाबच्या जनतेचे खूप चांगला निर्णय घेतला आहे. पंजाबमधील जनतेने पंजाबमध्ये नवा पर्याय निवडला म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, असे काँग्रेसच्या पराभवावर नवज्योतसिंग सिद्धू म्हटले होते.
काँग्रेस नवज्योत सिंग सिद्धू यांच्या डीएनएमध्ये नाही. त्यांना काँग्रेसची संस्कृती माहीत नाही. सिद्धू यांनी चन्नी आणि त्यांच्याच सरकारवर प्रश्नचिन्ह सुरू केले तेव्हा प्रियांका गांधी आणि राहुल गांधींनी त्यांना काँग्रेसमधून बाहेर फेकायला हवे होते, असे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेसचा सुफडासाफ केला. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला ९२ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला केवळ १८ जागा मिळाल्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App