Navjot Singh Sidhu : माजी क्रिकेटपटू, कॉंग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेऊन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. बुधवारी सिद्धू यांनी आपल्या ट्वीटर प्रोफाइलवरून काँग्रेस शब्द हटवला. यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर, त्यांनी एक ट्वीट करून कॅ. अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. एका गोळीबार प्रकरणाची एसआयटी चौकशी रद्द झाल्याने सिद्धूंनी नाव न घेता मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर हल्ला चढवला आहे. Navjot Singh Sidhu Criticizes Indirectly CM Amrinder Singh, Removed Congess From His Twitter Profile
विशेष प्रतिनिधी
अमृतसर : माजी क्रिकेटपटू, कॉंग्रेस नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेऊन पंजाबच्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध शड्डू ठोकले आहेत. बुधवारी सिद्धू यांनी आपल्या ट्वीटर प्रोफाइलवरून काँग्रेस शब्द हटवला. यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली आहे. एवढेच नाही तर, त्यांनी एक ट्वीट करून कॅ. अमरिंदर सिंग यांच्याविरुद्ध आघाडी उघडली आहे. एका गोळीबार प्रकरणाची एसआयटी चौकशी रद्द झाल्याने सिद्धूंनी नाव न घेता मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यावर हल्ला चढवला आहे.
Carefully crafted collusive abetment leading to …हम तो डूबेंगे सनम, तुम्हें भी ले डूबेंगे IIt is not a failure of the Govt or the party, but one person who is hand in glove with the culprits. pic.twitter.com/tp1rOj8Xox — Navjot Singh Sidhu (@sherryontopp) April 21, 2021
Carefully crafted collusive abetment leading to …हम तो डूबेंगे सनम, तुम्हें भी ले डूबेंगे IIt is not a failure of the Govt or the party, but one person who is hand in glove with the culprits. pic.twitter.com/tp1rOj8Xox
— Navjot Singh Sidhu (@sherryontopp) April 21, 2021
सिद्धू यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, ‘हम तो डूबेंगे सनम, तुम्हें भी ले डूबेंगे!’ त्यांनी पुढे लिहिलेय की, हे सरकारचे अथवा पक्षाचे अपयश नाही, तर एक माणसाचे आहे, ज्याने दोषींसोबत हातमिळवणी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे असेच आरोप विरोधी पक्षातील नेत्यांनी केले आहेत की, कॅप्टन आणि बादल यांच्यातील मैत्रीपूर्ण सामन्यामुळे एसआयटीचा अहवाल हायकोर्टात रद्द झाला.
दुसरीकडे, नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नुकत्याच वाढलेल्या राजकीय हालचालींचे अनेक अर्थ काढले जात आहेत. कॅ. अमरिंदर सिंग सरकारवर प्रत्यक्ष टीका करण्याची ते एकही संधी आता सोडत नाहीत. सातत्याने त्यांनी अप्रत्यक्ष रूपाने का होईना कॅ. अमरिंदर सिंग सरकारच्या अपयशांना जगजाहीर केले आहे. आधी त्यांनी शेतकरी आंदोलनास समर्थन देऊन कॅ. अमरिंदर सरकारवर प्रश्न उपस्थित केले होते. आता कोटकपुरा गोळीबार प्रकरणातील एसआटी रिपोर्ट रद्द झाल्यावरही त्यांनी टीका केली आहे.
पंजाब कॉंग्रेसमध्ये नवज्योत सिद्धू वेगळे पडले आहेत, परंतु आता त्यांना राजकारणातील बारकावे कळले आहेत. 2017च्या निवडणुकांनंतर सिद्धू आणि कॅप्टनमध्ये थेट संघर्ष सुरू आहे. आता तर त्यांनी आपल्या प्रोफाइलवरून काँग्रेस नाव काढल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
Navjot Singh Sidhu Criticizes Indirectly CM Amrinder Singh, Removed Congess From His Twitter Profile
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App