वृत्तसंस्था
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रपतीपदाच्या वावड्या दिल्ली – मुंबईत उडविण्यात आल्यानंतर पवार आधी राज्यसभेचे नेते पियूष गोयल यांना भेटले. त्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली आणि त्यानंतर आज पवारांनी साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या भूकंपापासून ते दिल्लीतली १० जनपथ भोवतीची राजकीय जमीन हादरल्याच्या बातम्यांना उधाण आले आहे. Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi
पवारांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली आहे. जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली असून त्यामध्ये नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.
पण प्रशांत किशोर – गांधी परिवार भेट, त्यानंतर उडविण्यात आलेल्या पवारांच्या राष्ट्रपतीपदाच्या वावड्या, त्या बातम्यांचा खुद्द पवारांनीच केलेला इन्कार यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खाते सोपविण्यात आले आहे. महाराष्ट्रात शिखर बँक घोटाळ्यापासून अनेक घोटाळ्यांमध्ये पवारांसह अनेकांच्या माना अडकलेल्या आहेत. पवारांनी नेमलेले गृहमंत्री अनिल देशमुखांची संपत्ती जप्त करण्यापर्यंत ED ची मजल गेली आहे. अजित पवारांच्या मामांच्या घरच्या कंपनीचा साखर कारखाना जप्त करण्यापर्यंत ED ची कारवाई येऊन ठेपली आहे. अजून ९ कारखाने जे पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित आहेत, त्या कारखान्यांपर्यंत ED चे हात केव्हाही पोहोचू शकतात, अशी अवस्था आहे. जी अवस्था राष्ट्रवादीची आहे, तीच अवस्था शिवसेनेच्या नेत्यांची आहे. अनिल परबांचे नाव ED च्या रडारवर आहे.
या पार्श्वभूमीवर शरद पवार हे मोदींच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोदींची गेल्या महिन्यात एकांतात भेट घेतली. त्यानंतर पवारांनी आज तासभर भेट घेतली आहे.
राज्यातील महाविकासआघाडी सरकार अस्थिर असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून विरोधकांकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काल देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर आज शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi pic.twitter.com/NuDCpGQSn8 — ANI (@ANI) July 17, 2021
Nationalist Congress Party leader Sharad Pawar calls on Prime Minister Narendra Modi in Delhi pic.twitter.com/NuDCpGQSn8
— ANI (@ANI) July 17, 2021
ही भेट दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेली नसून ती साऊथ ब्लॉकमधील पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली आहे. त्यामुळे संकेतांनुसार शासकीय कार्यालयात झालेल्या भेटीत राजकीय चर्चा होत नाही, असे मानले जाते.
पण या भेटीच्या आधी शरद पवारांनी पियुष गोयल यांची भेट घेतली होती. नुकतीच पियुष गोयल यांची राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर पियुष गोयल यांनी देशातील काही प्रमुख नेत्यांसोबतच शरद पवारांशी देखील चर्चा केली होती. त्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची देखील शरद पवारांनी भेट घेतली होती. आणि आता शरद पवारांनी पंतप्रधानांसोबत तासभर खलबते केल्यानंतर त्यातून वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App