विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पती दहशतवादी हल्यात शहीद झालेले. दोन मुलांची जबाबदारी. पण रक्तातच देशसेवा असल्याने पत्नीने लष्करी अधिकारी होऊन अनोखी श्रध्दांजली वाहिली आहे.जम्मू-काश्मीरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तीन वर्षांपूर्वी दीपक नैनवाल शहीद झाले होते. त्यांच्याच वीरांगणा ज्योती नैनवाल यांनी स्वत: लष्करी अधिकारी होऊन आपल्या पतीला खरी श्रद्धांजली वाहिली.National service in blood, after husband was martyred in terrorist attack, wife became military officer, mother of two children
येथे शनिवारी पासिंग आउट परेड पार पडला. यावेळी ज्योती यांच्यासोबत त्यांचा मुलगा आणि मुलगी सुद्धा उपस्थित होते. तीन वर्षांपूर्वी पती दीपक नैनवाल यांनी हौतात्म्य पत्करले तेव्हाच ज्योती यांनी देशसेवा करण्याचा निर्णय घेतला होता.
चेन्नई येथे शनिवारी पार पडलेल्या पासिंग आउट परेडमध्ये ज्योती यांनी आपल्या पतीच्या रेजिमेंटचे आभार मानले. या रेजिमेंटने आपल्याला एका लेकीसारखी वागणूक दिली. प्रत्येक पावलात रेजिमेंट माझ्या सोबत होती असे ज्योती यांनी सांगितले.
डेहराडून येथील हरार्वालाचे रहिवासी नायक दीपक नैनवाल काश्मीरात कार्यरत होते. 10 एप्रिल 2018 रोजी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत ते जखमी झाले. त्यांना 3 गोळ्या लागल्या होत्या. एक महिना मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 20 मे 2018 रोजी त्यांनी हौतात्म्य पत्करले.
त्याचवेळी त्यांच्या पत्नी ज्योती यांनी लष्करात सामिल होऊन देशाची सेवा करणार असल्याचा निर्णय घेतला.ज्योती यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचे नाव लावण्या असून ती सध्या चौथीला आहे. तर मुलगा रेयांश पहिलीत आहे. आई लष्करी अधिकारी बनल्यानंतर या मुलांच्या चेहऱ्या वर आनंद होता. आपणही मोठे होऊन आई-वडिलांप्रमाणे देशसेवा करणार असे ते म्हणतात.
दीपक यांचे वडील चक्रधर नैनवाल सुद्धा लष्करात होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. त्यांनी 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धासह, कारगिल युद्ध आणि अनेक लष्करी मोहिमांमध्ये सहभाग नोंदवला होता. तर दीपक यांचे आजोबा एक स्वातंत्र्य सैनिक होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App