
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या काशी विश्वनाथ कॉरिडॉरचं आज (13 डिसेंबर) मोदींच्याच हस्ते लोकार्पण होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या काशी विश्वनाथांच्या प्रांगणाच्या पुनर्बांधणीनंतर तब्बल अडीचशे वर्षांनंतर हे बांधकाम होत आहे.
- अधिकृत माहितीनुसार नरेंद्र मोदी 11 वाजता विशेष विमानानं बाबतपूर विमानतळावर पोहोचतील. Narendra Modi in Varanasi: Dedication of Kashi Vishwanath Corridor; Prime Minister Narendra Modi on a two-day visit to Uttar Pradesh
विशेष प्रतिनिधी
काशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशाताील वाराणासीच्या काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देश-विदेशातील पाहुणे काशीत येणार असल्याने देवालये, कुंड, गंगा घाट आदीची साफसफाईही करण्यात आली आहे.
तसेच या परिसरात विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे, त्यामुळे काशी शहर उजळून निघालं आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर काशीतील प्रत्येक घरात प्रसाद आणि एक पुस्तक दिलं जाणार आहे. एवढी जय्यत तयारी योगी प्रशासनाने केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. अधिकृत माहितीनुसार नरेंद्र मोदी 11 वाजता विशेष विमानानं बाबतपूर विमानतळावर पोहोचतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 वाजताच्या सुमारास काशी विश्वनाथ मंदिरात पूजा करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून वाराणसीच्या दौऱ्यावर …
आज दुपारी रोजी दुपारी एक वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान श्री काशी विश्वनाथाच्या मंदिरात जाऊन पूजा-अर्चा करतील आणि त्यानंतर ते काशी विश्वनाथ धाम च्या पहिल्या टप्प्यातील इमारतींचे उद्घाटन करतील. सुमारे 339 कोटी रुपये खर्चून हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
Tomorrow, 13th December is a landmark day. At a special programme in Kashi, the Shri Kashi Vishwanath Dham project will be inaugurated. This will add to Kashi's spiritual vibrancy. I would urge you all to join tomorrow's programme. https://t.co/DvTrEKfSzk pic.twitter.com/p2zGMZNv2U
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2021
ड्रिम प्रोजेक्ट…
प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर पंतप्रधान स्वतः देखरेख ठेवून होते, या प्रकल्पाविषयी, नियमितपणे माहिती, आढावा घेणे आणि देखरेखीचे काम त्यांनी वेळोवेळी केले. तसेच, कामाचा दर्जा वाढवण्यासाठी, प्रकल्पातील सुविधा सर्व भाविकांसाठी-अगदी दिव्यांगांसाठीही अधिकाधिक सहज साध्य होण्यासाठीच्या सूचना आणि सल्लेही त्यांनी वेळोवेळी दिले. या प्रकल्पाची संरचना अशा तऱ्हेची करण्यात आली आहे, जेणेकरुन, वृद्ध लोक आणि दिव्यांगांना इथे जाणे सुलभ होईल. त्यात रेंप, एस्केलेटर्स आणि इतर आधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत.
या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात, 23 इमारतींचे उद्घाटन केले जाणार आहे. या अंतर्गत, श्री काशी विश्वनाथ मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांना विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. यात, यात्री सुविधा केंद्र, पर्यटक सुविधा केंद्र, वैदीक केंद्र, मुमुक्षू भवन, भोगशाला, शहर वस्तूसंग्रहालय, पर्यटक गॅलरी, फूड कोर्ट अशा सुविधांचा समावेश आहे.
पंतप्रधान 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव मंदिराला भेट देतील आणि 13 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता रो-रो जहाजातून गंगा आरतीचे साक्षीदार होतील. 14 डिसेंबर रोजी, दुपारी 3:30 वाजता, पंतप्रधान वाराणसीतील स्वरवेद महामंदिर येथे सदगुरु सदाफलदेव विहंगम योग संस्थानच्या 98 व्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहतील. दोन दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधान आसाम, अरुणाचल प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या आणि बिहार आणि नागालँडच्या उपमुख्यमंत्र्यांचा सहभाग असलेल्या परिषदेत सहभागी होणार आहेत.
Narendra Modi in Varanasi: Dedication of Kashi Vishwanath Corridor; Prime Minister Narendra Modi on a two-day visit to Uttar Pradesh
महत्त्वाच्या बातम्या
Array