नांदेड : सिलिंडर विकत घ्यायचा की, घरात किराणा भरायचा ; उज्वला योजनेमुळे लाभार्थ्यांच्या डोळ्यात आले पाणी


नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यात सिलिंडर गॅसचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास तीन लाखावर उज्वला योजनेचे लाभार्थी आहेत.Nanded: To buy cylinders, to fill the house with groceries; Tears came to the eyes of the beneficiaries due to Ujwala Yojana


विशेष प्रतिनिधी

नांदेड : केंद्र सरकारने मोठा गाजावाजा करून उज्ज्वला योजना सुरु केली. मात्र, सिलिंडरचे भाव वाढल्याने लाभार्थी महिलांच्या डोळ्यात पाणी आले आहे.उज्वला योजनेतंर्गत नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यात सिलिंडर गॅसचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात जवळपास तीन लाखावर उज्वला योजनेचे लाभार्थी आहेत.

मात्र, गेल्या काही महिन्यांत सिलिंडरचे भाव चांगलेच वाढत चालले आहेत. ९५० रुपयाला सिलिंडर घेणे सामान्य परिवाराला परवडत नाही. त्यातही सबसिडीही जवळपास बंदच झाली आहे. सिलिंडर विकत घ्यायचा की, घरात किराणा भरायचा, असा प्रश्न लाभार्थी कुटुंबाला पडत आहे.सिलिंडर धुळखात ठेवून ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करता यावा, यासाठी जंगलात फिरून सरपण गोळा करताना दिसत आहे. चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी महिलांना रॉकेल लागत होते. उज्वला योजनेतून सिलिंडर देत असताना रॉकेलला कात्री लावण्यात आली.त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणारे रॉकेलही बंद झाले.

उज्वला योजनेचा हेतू

गरिब दारिद्र्य रेषेखाली जीवन जगणाऱ्या लाभार्थ्यांना स्वयंपाकाचा गॅस मिळावा तसेच जंगलतोड व चुलीमुळे होणारे प्रदूषण कमी व्हावे, यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतंर्गत गॅसचे वितरण केले. त्याला प्रतिसादही मिळाला. घराघरात सिलिंडर पोहोचला.

Nanded: To buy cylinders, to fill the house with groceries; Tears came to the eyes of the beneficiaries due to Ujwala Yojana

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती