युपीत प्रत्येक मतदारसंघात यादव, मुस्लिमांची नावे हटवली; अखिलेशना आरोपांवर पुरावे देण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील प्रत्येक मतदारसंघातून 20 हजार यादव आणि मुस्लिम मतदारांची नावे मुद्दामून यादीतून हटवण्यात आली आहेत, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केला होता. अखिलेश यादव यांच्या या सार्वजनिक आरोपाची दखल घेऊन निवडणूक आयोगाने त्यांना या आरोपांबाबत पुरावे सादर करण्यासाठी नोटीस दिली आहे. Names of Yadavs, Muslims deleted in every constituency in UP

उत्तर प्रदेशातील प्रत्येक मतदारसंघातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांची नावे हटवली असतील, तर त्याचे पुरावे 10 नोव्हेंबर 2022 पर्यंत सादर करावेत, असे आदेश निवडणूक आयोगाने अखिलेश यादव यांना यांना दिले आहेत. अखिलेश यादव यांच्या आरोपांमध्ये तथ्य आढळले आणि त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार आरोप सिद्ध झाले तर निवडणूक आयोग यासंदर्भात गंभीर कायदेशीर कारवाई करणार आहे.

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ठिकठिकाणी प्रचार सभेत अखिलेश यादव भाजप वर वारंवार आरोप करत होते. राज्यात प्रत्येक मतदारसंघात यादव, मुस्लिम मतदारांची तब्बल 20 हजार नावे मतदार यादीतून कमी करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. याच आरोपाची आता निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत त्यांना ते आरोप सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करण्याची आदेश दिले आहेत. 10 नोव्हेंबरला अखिलेश यादव आपणच केलेल्या आरोपात संदर्भात नेमके काय पुरावे सादर करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Names of Yadavs, Muslims deleted in every constituency in UP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात