भारतासाठी इस्रायली नागरिकांनी केली सांगितीक प्रार्थना


विशेष प्रतिनिधी

तेल अविव : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेशी लढणाऱ्या भारताला आज शेकडो इस्रायली नागरिकांनी एका सांगितीक कार्यक्रमाद्वारे भावनिक पाठबळ दिले. गाण्याद्वारे प्रेमाचा संदेश पाठवत या नागरिकांनी भारतातील परिस्थिती वेगाने सुधारावी, अशी प्रार्थना केली. Musical prayers by Israeli citizens for India

इस्राईलची राजधानी तेल अविव येथे ‘हाबिमा स्क्वेअर’मध्ये काल (ता. ६) झालेल्या या कार्यक्रमात भारतातील अनेक संगीतकारांनी दूर दृश्यम प्रणालीच्या माध्यमातून सहभाग घेतला होता. अतिव भन्साळी आणि आशिष रागवानी यांनी गायलेले ‘केशव माधव हरी हरी बोल’ हे भक्तीगीत या कार्यक्रमात दाखविले गेले.‘युनाइट इन बॅबिलॉन’ या ग्रुपने ‘सिंगिंग सर्कल’ या नावाने हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये सहभागी सर्व कलाकारांनी एका वर्तुळात उभे रहात गाणे म्हटले, वाद्य वादन केले. हिब्रू, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील गाणी यावेळी म्हणण्यात आली. या वर्तुळात सहभागी नसलेल्या, मात्र कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या लोकांनीही उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला.

Musical prayers by Israeli citizens for India

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण