वृत्तसंस्था
नवी दिल्ली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवानी यांनी वापरलेले संसदेतले दालन क्रमांक ४ आता भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे संसदेतले कार्यालय असेल.MP JP Nadda gets office of former PM late Atal Bihari Vajpayee at Parliament
मात्र, या कार्यालय नड्डा हे बसणार असले, तरी त्यावरच्या अटलजी आणि अडवानींच्या नेमप्लेट त्यांनी हटविलेल्या नाहीत. कारण त्यांच्या दृष्टीने तो एक सन्मानाचा विषय आहे. कार्यालयातल्या बाकीच्या सुविधा बदलण्यात आल्या आहेत.
२००४ मध्ये अटलजींना एनडीएचे अध्यक्ष म्हणून हे दालन कार्यालय म्हणून मिळाले होते. त्यांनी क्वचित त्याचा वापर केला. त्यांच्या नंतर लालकृष्ण अडवानी यांचे ते कार्यालय राहिले. २०१९ पर्यंत अडवानी खासदार होते. तोपर्यंत त्यांनी या कार्यालयाचा वापर केला.
गेल्या दोन वर्षांपासून या कार्यालयाचा वापर होत नव्हता. आता भाजप अध्यक्ष आणि ज्येष्ठ संसद सदस्य या नात्याने जे. पी. नड्डा हे या कार्यालयात बसतील. परंतु, त्यांनी अटलजींच्या आणि अडवानींच्या नावाच्या पाट्या तिथून हलविलेल्या नाहीत. तो त्यांचा सन्मान आहे, असे ते म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App