गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांना मोठा धक्का दिला आहे. संजय राऊत यांना शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी खासदार गजानन कीर्तिकर यांना संधी देण्यात आली आहे. गजानन कीर्तिकर हे सर्वात शेवटी शिंदे गटात दाखल झाले होते. MP Gajanan Kirtikar was appointed after Sanjay Raut was removed from the post of group leader of ShivSena
शिवसनेच्या (शिंदे गट) कार्यकारिणीची फेब्रुवारी महिन्यात मुंबईत महत्त्वाची बैठक झाली होती. या बैठकीत संसदीय नेतेपदी गजानन किर्तीकर यांची निवड करण्यात आली होती. त्यासंबंधीचा प्रस्ताव २१ फेब्रुवारीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता. आता याबाबतची अधिकृत माहिती आज (२३ मार्च) लोसभा अध्यक्षांना पत्राद्वारे देण्यात आली आहे.
ओबीसी समजाचा वारंवार अपमान करणाऱ्या राहुल गांधींविरोधात भाजपा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करणार – चंद्रशेखर बावनकुळे
गजानन कीर्तिकर हे १९९० ते २००९ या काळात मालाड विधानसभा मतदारसंघातून ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले. १९९५मध्ये शिवसेना – भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गुरुदास कामत यांचा १ लाख ८३ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. ते सलग दोनदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.
शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदी नियुक्ती करुन माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल शिवसेना मुख्यनेते मुख्यमंत्री @mieknathshinde तसेच संसदेतील सर्व शिवसेनेतील सहकाऱ्यांचे मी व्यक्तिशः आभार मानतो. @shewale_rahul @DrSEShinde pic.twitter.com/fZzYztX778 — Gajanan Kirtikar -गजानन कीर्तिकर (@GajananKirtikar) March 23, 2023
शिवसेना पक्षाच्या संसदीय गटनेतेपदी नियुक्ती करुन माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल शिवसेना मुख्यनेते मुख्यमंत्री @mieknathshinde तसेच संसदेतील सर्व शिवसेनेतील सहकाऱ्यांचे मी व्यक्तिशः आभार मानतो. @shewale_rahul @DrSEShinde pic.twitter.com/fZzYztX778
— Gajanan Kirtikar -गजानन कीर्तिकर (@GajananKirtikar) March 23, 2023
मागील महिन्यात ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. तसेच, राज्यातील सत्तासंघर्षावरील निकालही सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App