बहुतांश राज्ये ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प मोहीम वेगात

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचे संकट अधिक गडद झाल्यानंतर केंद्र सरकारने बहुतांश राज्यांतील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन उत्पादन प्रकल्प उभारण्याची मोहीम सुरू केली होती. आता बहुतांश राज्ये ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. Most states are self-sufficient in oxygen productionOxygen production project expedited

या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारमध्ये करार करण्यात आला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, देशातील ३६ पैकी २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १०० % म्हणजेच प्रत्येक जिल्ह्याचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट आहे. हे वायू निर्माण प्रकल्प स्थानिक प्रमुख रुग्णालयांसह परिसराला ऑक्सिजनचा पुरवठा करत आहेत.



११ राज्यांमध्ये काही कामे करणे बाकी आहे. यापैकी, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, नागालँड आणि लडाखमध्ये दोन किंवा अधिक प्लांट सुरू व्हायचे आहेत. राजस्थान, मेघालय, मिझोराम, मध्य प्रदेश, झारखंड आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी एक प्लांट सुरू झालेला नाही.

अहवालानुसार, केंद्र सरकारने देशात १५६१ ऑक्सिजन उत्पादन संयंत्रांना मान्यता दिली आहे. त्यापैकी १२२५ संयंत्रांच्या उभारणीसाठी पंतप्रधान सहायता निधीतून बजेट देण्यात आले होते. तर उर्वरित ३३६ प्रकल्पांना इतर मंत्रालयांकडून बजेट देण्यात आले होते. आतापर्यंत १५६१ पैकी १५४१ म्हणजे ९८.७१ टक्के कार्यरत आहेत.

Most states are self-sufficient in oxygen productionOxygen production project expedited

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात