मोरारजी 82 व्या वर्षी पंतप्रधान बनले, पण मी…!!; स्वप्नाच्या पाठलागावर पवार काय म्हणाले वाचा!!


प्रतिनिधी

ठाणे : देशाच्या पंतप्रधानपदाचे 1991 मध्ये पाहिलेले स्वप्न शरद पवारांचा आज 2022 मध्येही पाठलाग करत आहे. पंतप्रधानपदाच्या मुद्द्यावर त्यांनी आज ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत बऱ्याच दिवसांनी भाष्य केले. मोरारजी देसाई हे वयाच्या 82 व्या वर्षी पंतप्रधान बनले, पण तसे कोणतेही पद मी स्वीकारणार नाही. सत्तेच्या कोणत्याही पदावर मी बसणार नाही, असा खुलासा शरद पवारांनी केला आहे. Morarji Desai became Prime minister at the age of 82, but sharad Pawar “refuse” to become prime minister at this age

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेत आपल्या स्वप्नातले पंतप्रधानपद ते आपले नातू रोहित पवार यांची ईडी चौकशी इथपर्यंतच्या सर्व प्रश्नांना पवारांनी उत्तरे दिली. विरोधी पक्षांचे ऐक्य घडविण्याचा जरूर प्रयत्न करणार. भाजपला आव्हान देणार. भाजपच्या पराभवासाठी प्रयत्न करणार, पण पंतप्रधान स्वीकारणार नाही. सत्तेच्या कोणत्याच पदावर बसणार नाही. आज माझे वय 82 आहे. मोरारजी देसाई हे वयाच्या 82 व्या वर्षीच पंतप्रधान बनले, पण माझ्या बाबतीत तसे काही होणार नाही, असे शरद पवार म्हणाले.

बिल्कीस बानू प्रकरणावरून पुन्हा टीका

गुजरात मधल्या बिल्किस बानू बलात्कार प्रकरणाच्या मुद्द्यावरून पवारांनी पुन्हा एकदा केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि गुजरात मधल्या भाजप सरकारवर शरसंधान साधले. दिल्लीत अल्पसंख्यांक मेळाव्यात पवारांनी या विषयावरच मोदी सरकारला घेरले होते. बिल्केश बानू प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने देऊनही गुजरात सरकारने त्यांना सोडून दिले इतकेच नव्हे, तर सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आरोपींचा सत्कार केला हे अत्यंत गैर असल्याचे टीकास्त्र पवारांनी सोडले.

रोहित पवारांची बाजू घेतली

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी होणार आहे भाजपचे नेते मोहित कंपोज आणि किरीट सोमय्या यांनी तसेच उत्सवाच्या केले आहे या मुद्द्यावर पवारांनी भाजपला टोचले काही नेत्यांना ईडी चौकशीचा आधीच सुगावा लागतो. आपल्याला बरीच अधिकृत माहिती असल्याचे ते भासवत राहतात आणि त्यामुळे त्यांना मीडियात बातम्यांमध्ये राहता येते, असे टीकास्त्र पवारांनी सोडले.

Morarji Desai became Prime minister at the age of 82, but sharad Pawar “refuse” to become prime minister at this age

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    अभूतपूर्व गर्दी अन् अविस्मरणीय महाराष्ट्र भूषण सोहळा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची काही निवडक ग्रंथसंपदा… ‘’टायगर…’’ बस्स नाम ही काफी है!