उत्तर प्रदेशच्या शाळांमध्ये मोहरमच्या सुट्ट्या रद्द, योगी सरकारने जारी केले आदेश

अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन सत्राचे प्रत्येक शाळेत थेट प्रक्षेपण करण्याच्या सूचना

विशेष प्रतिनिधी

लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये इयत्ता बारावी पर्यंतच्या शाळांमध्ये आज (२९ जुलै) असणारी मोहरमची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यासाठी, शालेय शिक्षण महासंचालक कार्यालय आणि राज्य प्रकल्प संचालक, लखनऊ यांनी बरेलीसह राज्यातील सर्व जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र जारी केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत आयोजित केलेल्या अखिल भारतीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन सत्राचे प्रत्येक शाळेत थेट प्रक्षेपण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Moharram holidays canceled in Uttar Pradesh schools Yogi government issues orders

जिल्हा पायाभूत शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या शुभ मुहूर्तावर नवी दिल्ली येथे आज (२९ जुलै) आयोजित अखिल भारतीय शैक्षणिक समागम कार्यक्रमासाठी सर्व शाळा उघडण्यात येणार आहेत. कार्यक्रम थेट शाळांमध्ये आयोजित केले जातील. प्रसारणाची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

शिक्षण महासंचालक विजय किरण आनंद यांनी जारी केलेल्या आदेशात असे सांगण्यात आले आहे की, पंतप्रधानांच्या अखिल भारतीय शैक्षणिक समागम कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे थेट प्रक्षेपण शाळा स्तरापर्यंत वेबकास्टद्वारे केले जाईल. त्याचे प्रसारण करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, त्यांनी या पत्रात सांगितले की, शालेय स्तरावरील उद्घाटन सत्रात सहभागी झालेल्या सर्व लोकांची माहिती संध्याकाळपर्यंत शिक्षण मंत्रालयाकडे पाठविण्याचे सांगण्यात आले आहे.

Moharram holidays canceled in Uttar Pradesh schools Yogi government issues orders

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात