विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज नवी दिल्लीत मेळावा घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे युपीए चेअरमन पद सोपवावे, असा ठराव मंजूर केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यात शरद पवार उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा ठराव झाल्यामुळे या ठरावाला महत्त्व असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.Modi – Memon – Pawar: Majid Memon praises Modi; But to avoid Pawar’s question !
या मेळाव्यात अर्थातच शरद पवार यांचे मुख्य भाषण झाले. त्यामध्ये त्यांनी “द काश्मीर फाईल्स” या सिनेमावर जोरदार शरसंधान साधले. या सिनेमामुळे समाजात फूट पडते आहे. ऐक्याला तडा जातो आहे. त्यावेळी म्हणजे 1990 च्या दशकात जे घडले ते वाईट होते. अनेकांना विस्थापित व्हावे लागले पण ते विसरून जाऊन समाजातली एकता टिकवली पाहिजे, असे प्रतिपादन शरद पवार यांनी मेळाव्यात केले.
मेळाव्यातून बाहेर आल्यानंतर पत्रकारांशी बोलताना देखील पवारांनी “द काश्मीर फाईल्स”च्या मुद्द्यावरच भर दिला. त्यावेळी पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंह होते. गृहमंत्री मुक्ती मोहम्मद सईद होते. भाजपचा त्यांना पाठिंबा होता. राज्यपाल कोण होते, हे सर्वांना माहिती आहे, असे वक्तव्य त्यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे टीकास्त्र सोडले. हा सिनेमा चांगला आहे, असे स्वतः पंतप्रधानच म्हणतात. पण महाराष्ट्र विधानसभेत त्यानंतर अधिवेशन सुरू असताना एकही आमदार उपस्थित नव्हता सगळेजण सिनेमाला गेले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
मोदी स्तुतीचा प्रश्न टाळला
मात्र त्याच वेळी उपस्थित पत्रकाराने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार माजिद मेमन यांनी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे, याकडे शरद पवार यांचे लक्ष वेधले होते. परंतु त्या प्रश्नाला उत्तर न देता शरद पवार तेथून निघून गेले. माजिद मेमन यांनी दोनच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करणारे ट्विट केले होते. पंतप्रधान मोदी हे लोकप्रिय नेते आहेत
त्यांच्यात नक्की असे काहीतरी गुण असले पाहिजेत की ज्यामुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि विरोधक मात्र त्यांचे हे गुण ओळखू शकत नाहीत, असे नेमके बोट माजिद मेमन यांनी विरोधकांवर ठेवले होते. याच संदर्भात संबंधित पत्रकाराने प्रश्न विचारला होता. परंतु त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत पवार तेथून निघून गेले. विविध न्युज चॅनलच्या फुटेजमधून ही बाब लक्षात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App