विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संपूर्ण देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मार्च 2020 मध्ये जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला आता आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. जेणेकरुन कोरोनाच्या या संकट काळात गरीब आणि वंचित लाभार्थ्यांना अन्नधान्याची कमतरता भासणार नाही .Modi Govt to provide free food grains to poor in May, June, spend Rs 26,000 cr
कोरोनाच्या या संकटात नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले आहेत. आता ह्या निर्णयाने गरीबांना 2 महिने अन्नधान्याची कमतरता भासणार नाही.
Government of India to provide free foodgrains under PM Garib Kalyan Ann Yojana for May & June 2021. 5 kg free food grains to be provided to around 80 crore beneficiaries. Government of India would spend more than Rs 26,000 crore on this initiative: Government of India — ANI (@ANI) April 23, 2021
Government of India to provide free foodgrains under PM Garib Kalyan Ann Yojana for May & June 2021. 5 kg free food grains to be provided to around 80 crore beneficiaries. Government of India would spend more than Rs 26,000 crore on this initiative: Government of India
— ANI (@ANI) April 23, 2021
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना मे आणि जून 2021 पर्यंत मोफत अन्नधान्याचा पुरवठाकरण्यात येणार आहे.
मे आणि जून 2021 या महिन्यांत गरीब लाभार्थी नागरिकांना 5 किलो मोफत धान्य दिले जाणार आहे. या योजनेमुळे जवळपास 80 कोटी लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळेल.
कोरोनाची दुसरी लाट संपूर्ण देशभरात पहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक राज्यांनी कठोर निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. अशा या संकटाच्या परिस्थितीत अनेक गरीबांना झळ बसू नये यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना आणखी दोन महिने वाढवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. यासाठी केंद्र सरकार 26,000 कोटींहून अधिक रुपये खर्च करणार आहे
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी लाभार्थ्यांना पाच किलो गहू आणि तांदुळासह एक किलो चणे देण्यात येत आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले आहेत अशा परिस्थितीत परप्रांतीय मोठ्या प्रमाणात पलायण करत आहेत त्यांची अन्नासाठी परवड होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App