विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तंत्रज्ञानाचा वापर करून सामान्यांचे जीवन सुकर करण्यासाठी मोदी सरकार सातत्याने काम करत आहे. आता विद्यार्थ्यांसाठी मोदी सरकारने मोठी सुविधा तयार करण्याचे ठरविले आहे. स्कॉलरशिप, फेलोशिपच्या सगळ्या योजना आता एका प्लॅटफॉर्मवर आणण्यात येणार आहे.Modi government to bring all facilities for students, scholarships, fellowship schemes on one platform
विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने यासाठी पुढाकार घेतला आहे. केवळ याच मंत्रालयाच्या नव्हे तर सर्वच केंद्रीय मंत्रालयाच्या विद्यार्थ्यांसाठीच्या योजना आता एका प्लॅटफॉर्मवर येणार आहे. विद्यार्थी आणि संशोधकांना याचा फायदा होणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी अनेक शासकीय योजना असतात. मात्र, त्याची माहिती सगळ्यांनाच मिळत नाही. त्यासाठी इकडे तिकडे भटकावे लागते. या सगळ्या योजनांची एकाच ठिकाणी माहिती मिळाल्यावर विद्यार्थ्यांना त्यांचा फायदा घेणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर एकाच प्रकारच्या योजनांसाठी आता एकच अर्ज करता येणार आहे.
सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून शाळांपासून ते पदवी, पदव्युत्तर आणि पीएचडी स्तरावरील फेलोशिप आणि स्कॉलरशिपच्या योजनांचे संचालन केले जाते. मात्र, त्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर अर्ज करावे लागतात,
परीक्षा द्याव्या लागतात. त्याचबरोबर इतर मंत्रालयांच्याही योजनांसाठी वेगळे अर्ज करावे लागतात. आता ही सगळी प्रक्रिया सोपी आणि विद्यार्थीकेंद्री केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता वेगवेगळे अर्ज करावे लागणार नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App