मोदींच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा; आरोग्य,आत्मनिर्भर भारत, ‘व्होकल फॉर लोकल’ वर भर!!

  • भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर यांच्याकडे महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोव्याची जबाबदारी !

प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त (१७ सप्टेंबर) विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून देशभरात साजरा करण्याची जय्यत तयारी भाजपने केली आहे. विशेषतः आत्मनिर्भर भारत, “व्होकल फॉर लोकल” या मोदींच्या महत्वाकांक्षी योजनांवर यंदा विशेष भर असणार आहे. हा सेवा पंधरवडा संपूर्ण देशभर विविध राज्यांमध्ये स्थानिकातल्या स्थानिक पातळीवर साकार करण्याची जबाबदारी भाजपने राष्ट्रीय सचिवांवर दिली आहे. यामध्ये राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह, राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवर दास, राष्ट्रीय सचिव विजय रहाटकर, विनोद सोनकर, अरविंद मेनन, भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष खासदार तेजस्वी सूर्य, विजय चाहर आणि अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष डॉ. जमाल सिद्दिकी यांच्याकडे देण्यात आली आहे. विजया रहाटकर यांच्याकडे महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश आदी राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. Modi birthday to be celebrated as seva pakhwada by BJP at national level

 मोदी वाढदिवस ते महात्मा गांधी जयंती

या ‘सेवा पंधरवडा’ कार्यक्रमात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) असे १५ दिवस भाजपतर्फे देशभरात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतच्या ८ सदस्यीय राष्ट्रीय समितिचे नेतत्व करणारे राष्ट्रीय भाजप महासचिव अरुण सिंह यांनी देशभरातील भाजप शाखांना प्रदेशाध्यक्षांच्या नावे याबाबत एक पत्र लिहिले आहे.


PM Modi Independence Day Speech : ‘आपल्याला ब्रिटिशांसारखे दिसण्याची गरज नाही’, वाचा पंतप्रधान मोदींच्या भाषणातील टॉप-10 मुद्दे


 “व्होकल फॉर लोकल”वर भर

मोदी यांच्या वाढदिवसाचे नियोजन आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर देखरेख ठेवणे, ठरविलेले उपक्रम “नमो ॲप”वर डाऊनलोड केले जातात की नाही, हे पाहण्यासाठी भाजपचे सरचिटणीस अरुण सिंह यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समितीही स्थापन केली आहे. “व्होकल फॉर लोकल”च्या माध्यमातून स्वावलंबी भारताच्या उपक्रमाला चालना द्यावी, असे भाजपने निर्देशांमध्ये म्हटले आहे. पक्षाच्या प्रत्येक जिल्हा व विभागीय मुख्य पदाधिकाऱ्यांनी स्थानिक उत्पादने खरेदी करून त्याचा व्हिडिओ नमो अॅपवर अपलोड करावा.

 खादी खरेदीस प्रोत्साहन

विशेषतः खादीच्या विक्रीत चौपट वाढ झाल्यामुळे खादी विक्री केंद्रातून खादीच्या वस्तूंची खरेदी करून त्याचे फोटो अपलोड करावेत. याबाबत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 10 जिल्हाध्यक्षांचा नंतर देशपातळीवर गौरव करण्यात येणार आहे.

 मोदी @ 20 सपने हुए साकार

“मोदी @ 20 – सपने हुए साकार” या पुस्तकाची देशभरात प्रसिद्धीही करण्यात येणार आहे. या संकल्पनेची जबाबदारी असलेले माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर, भाजपचे पुढचे ‘टार्गेट’ असलेल्या दक्षिणेकडील तेलंगणासह ४ राज्यांत या पुस्तकाची दणकेबाज प्रसिध्दी करण्याची जबाबदारी दिली आहे.

 असा घेणार सेवा पंधरवडा

मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या कोट्यवधी लाभार्थ्यांच्या शुभेच्छा संदेश पाठवावेत आणि त्यांची संख्या नमो अॅपवर अपलोड करावी. मोदींचे व्यक्तित्व आणि कार्य यावर देशभरात राज्य आणि जिल्हा स्तरावर चित्र व ध्वनीचित्र प्रदर्शने आयोजित करणार. प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिरे, कृत्रिम अवयव व उपकरणे वाटप आदी उपक्रम राबवणार.

कोरोना लसीकरण मोहिमेलाही गती देण्यास सांगितले आहे. वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पाणी हेच जीवन आदी मोहीमाही या काळात घेणार.

या सेवा पंधरवड्यात पंतप्रधान मोदींचे व्यक्तिमत्व, व्हीजन, दूरदृष्टीने व योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची क्षमता, मोदी सरकारच्या योजना, धोरणे आणि उपलब्धी यावर चर्चा करण्यासाठी बुध्दिवादी वर्गासह विचारवंतांच्या परिषदा आयोजित केल्या जाणार आहेत.

२५ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त बूथ स्तरावर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ऑक्टोबरला बापूंची तत्त्वे, स्वदेशी, खादी, साधेपणा आणि स्वच्छता याविषयीही भाजपच्या वतीने विशेष मोहीमा राबविण्यात येणार आहेत.

मोदी वाढदिवस कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रत्येक राज्यात पाच सदस्यीय तर जिल्हास्तरांवर तीन सदस्यीय समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. सर्व खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनाही या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Modi birthday to be celebrated as seva pakhwada by BJP at national level

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात