वृत्तसंस्था
इंफाळ : मणिपूरमध्ये 25 दिवसांनंतरही जातीय तणावाची परिस्थिती नियंत्रणात आलेली नाही. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात पुन्हा अस्थिरतेची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी रात्री जमावाने भाजप नेत्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुरक्षा दलांना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. या चकमकीत मेरी कोमच्या मूळ गावावरही हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे.Mob attack on BJP MP, situation worsens again in Manipur, security forces are tight
इंफाळमध्ये पुन्हा तणाव वाढला
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. खासदार आणि भाजपचे प्रमुख नेते राजकुमार रंजन सिंह यांच्यावर जमावाने हल्ला केल्याचे समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला अश्रुधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. काल रात्री मणिपूरच्या इम्फाळ पूर्वेतील कोंगपा नंदेई लेकेयी येथे मोठा जमाव जमला होता. त्यानंतर सुरक्षा दलांनी त्यांचा पाठलाग केला. इम्फाळ पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही ठिकाणी पूर्णवेळ कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. याशिवाय बिष्णुपूर आणि टेंगोपालमध्ये 24 तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये संचारबंदीमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही.
लष्कराने ट्विट करून दिली माहिती
भारतीय लष्कराने ट्विट करून सांगितले की, ऑपरेशन सुरू आहे. संपूर्ण मणिपूर लष्कर आणि आसाम रायफल्सच्या ताब्यात आहे. लष्कराकडून सांगण्यात आले की, इम्फाळ पूर्व आणि चुराचांदपूर येथे सुरक्षा दलांनी दोन समुदायांमध्ये गोळीबाराची घटना रोखली. यादरम्यान सशस्त्र हल्लेखोरांनी गोळीबार केला आणि उंच भागाकडे पळ काढला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून शोधमोहीम सुरू आहे.
मणिपूरमध्ये सोमवारपासून पुन्हा तणाव
ईशान्येकडील मणिपूर राज्यातील हिंसाचार थांबलेला नाही. सोमवारी पुन्हा एकदा परिसरात तणाव वाढला. राजधानी इंफाळच्या न्यू लॅम्बुलेन भागात जमावाने घरे जाळली होती. यानंतर लष्कर आणि निमलष्करी दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. राज्यात हिंसाचार भडकल्याने पुन्हा एकदा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
सोमवारी राज्यात सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. जाळपोळीचे वृत्त आल्यानंतर पाच दिवस इंटरनेटही बंद ठेवण्यात आले होते. असे सांगण्यात आले की, सोमवारी सकाळी इंफाळच्या न्यू चेकन बाजार परिसरात हिंसक चकमक झाली. जाळपोळीच्या घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात लष्कराचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App