भारतीय क्षेपणास्त्रेही आता इंधनाच्या बाबत आत्मनिर्भर होणार आहेत. खनिज तेल निगमने संरक्षण साहित्य, साठवणूक संशोधन आणि विकास संस्थापना म्हणजे डीएमएसआरडीईच्या सहाय्याने क्षेपणास्त्रांसाठी स्वदेशी इंधनाची निर्मिती केली आहे. हे इंधन चाचणीसाठी भारतीय लष्कराकडे पाठविण्यात आले आहे. या इंधनाची चाचणी देखील यशस्वी झाली आहे.Missiles are also now self-sufficient in fuel, successful testing of indigenous fuels at NABL
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय क्षेपणास्त्रेही आता इंधनाच्या बाबत आत्मनिर्भर होणार आहेत. खनिज तेल निगमने संरक्षण साहित्य, साठवणूक संशोधन आणि विकास संस्थापना म्हणजे डीएमएसआरडीईच्या सहाय्याने क्षेपणास्त्रांसाठी स्वदेशी इंधनाची निर्मिती केली आहे. हे इंधन चाचणीसाठी भारतीय लष्कराकडे पाठविण्यात आले आहे. या इंधनाची चाचणी देखील यशस्वी झाली आहे.
देशाची सुरक्षा बळकट करणाऱ्या पृथ्वी, अग्नी, सूर्य, शौर्य, प्रहार आणि ब्रह्मोस यासह इतर क्षेपणास्त्रांमध्ये आता स्वदेशी इंधनाचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे क्षेपणास्त्रांची गती वाढणार असून इंधन खर्चात 20 ते 25 टक्के बचत होणार आहे.
कमी इंधनामुळे हे क्षेपणास्त्र जास्त अंतरापर्यंत धडक मारू शकेल, असा दावा खनिज तेल निगमने केला आहे. क्षेपणास्त्र पाठविण्यासाठी तयार केलेले इंधन जास्त दिवसांपर्यंत जळते. प्राथमिक चाचणीत ते अधिक चांगले असल्याचे आढळले आहे. क्षेपणास्त्रांच्या वापरासाठी आता याची चाचणी घेण्यात येत आहे.
क्षेपणास्त्राचे इंधन अजूनही विदेशातून येते. कोरोना काळात सुमारे एक वर्ष केलेल्या संशोधनानंतर त्यांनी या क्षेपणास्त्रांचे इंधन बनवले आहे, अशी माहिती निगमचे प्रबंध संचालक विकासचंद्र अग्रवाल यांनी दिली.
प्रयोगशाळांसाठीच्या चाचणी आणि मूल्यांकन राष्ट्रीय मान्यता मंडळ अर्थात एनएबीएलमध्ये या इंधनांची यशस्वी करण्यात आली आहे. आता उच्चस्तरीय चाचणीसाठी ते लष्कराकडे पाठविण्यात आले आहे. तिथे मंजुरी मिळाल्यानंतर क्षेपणास्त्रांमध्ये या इंधनाचा वापर करण्यात येईल. हे इंधन बूस्टरयुक्त देखील आहे, त्यामुळे क्षेपणास्त्राला गती देण्यास मदत करेल.
खनिज तेल निगम गेल्या वर्षभरापासून वायुसेनेच्या लढाऊ विमानांसाठी वंगण देत होते. गेल्या 25 वर्षांपासून ते हे वंगण बनवीत आहेत. लढाऊ विमानांच्या काही भागांमध्ये ते वापरले जाते. याशिवाय निगमतर्फे लष्कराला एक्स-52 तेल, पीएक्स-6 तेल आणि पीएक्स-11 जेलचा देखील पुरवठा करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App